Header AD

कल्याण डोंबिवली दर्शन बसच्या कामाला सुरवात महापालिका क्षेत्रातील पर्यटनस्थळे पाहण्याची नागरिकांना संधी
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली व आसपासच्या परिसरातील नयनरम्य पर्यटनस्थळे नागरिकांना पाहता यावी यासाठी मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली दर्शन बस सेवा सुरु करण्यात येणार असून या बसच्या कामाला आज सुरवात करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.


कल्याण शहराची ऐतिहासिक नगरी तर डोंबिवली शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. या शहरातील आणि आसपासची पर्यटनस्थळे एकाच दिवशी पाहता यावी यासाठी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी मुंबईमध्ये ज्याप्रकारे दर रविवारी बस चालवली जाते त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली दर्शन बस सेवा सुरू करण्याची मागणी पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी हि मागणी मान्य केल्यामुळे या  बसचे काम करण्याचा शुभारंभ आज गणेश घाट डेपो येथे पार पडला. यावेळी परिवहन सदस्य बंडू पाटीलअनिल पिंगळे आगार व्यवस्थापक संदिप भोसले साहेब व अधिकारी.कर्मचारी उपस्थित होते.


       कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला, गणेश घाट, बाळासाहेब ठाकरे स्मारक, टिटवाळा गणेश मंदिर, वैष्णोदेवी मंदिर टिटवाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शहाड बिर्ला मंदिर, खिडकाळी मंदिर, डोंबिवली गणेश मंदिर, कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक, बारावे व कचोरे येथील जलशुद्धीकरण केंद्र तसेच महापालिकेचे विविध प्रकल्प आदी ठिकाणची सैर नागरिकांना करता येणार आहे. दररविवारी हि बससेवा नागरिकांसाठी उपलब्ध होणार असून यासाठी नाममात्र भाडं आकरण्यात येणार आहे. तर महपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना या बससेवा मोफत असणार आहे. १५ एप्रिल पर्यंत या बसचे काम पूर्ण होऊन हि बस नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याची माहिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.   
कल्याण डोंबिवली दर्शन बसच्या कामाला सुरवात महापालिका क्षेत्रातील पर्यटनस्थळे पाहण्याची नागरिकांना संधी कल्याण डोंबिवली दर्शन बसच्या कामाला सुरवात महापालिका क्षेत्रातील पर्यटनस्थळे पाहण्याची नागरिकांना संधी  Reviewed by News1 Marathi on March 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads