रेड लाईट मधील महिलांची यशाचे एक पाऊल श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती खान यांचा अनोखा उपक्रम
भिवंडी  (प्रतिनिधी )  समाजातील दूर्लक्षीत असलेल्या रेड कार्पेट भागातील महीलांसाठी एक पाऊल पुढे टाकत डॉ स्वाती खान यांनी विवीध आनोखे उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे........... शेवटी म्हणा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कार्याबाबत आजच्या महीला दिनी त्यांना मानाचा मुजरा.आपल्या शालेय जीवना पासून बालविवाह प्रतिबंधक आणण्यासाठी अतोनाहक प्रयत्न करून हि त्यात यश न आल्याने डॉ स्वाती खान यांनी महिला व मुलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्याकरिता महाविद्यालयीन जीववनात काही प्रमाणात त्यांना यश आल्याने सन २०१४ मध्ये त्यांनी श्री साई सेवा संस्थेची स्थापना करून आपले सामाजिक कार्य सुरु केले . आज या त्यांच्या कार्याला तब्बल सह वर्ष पूर्ण होत आहे 


         डॉ स्वाती खान यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवना पासून सुरु केलेल्याने  स्वावलंबी महिला साठी महिला बचत गटाची स्थापना करून शिलाई मशीन उपलब्ध केल्याने रेड लाईट एरियामधील महिलांना त्याचे प्रशिक्षण दिले गेल्याने याना काही प्रमाणात रोजी रोटो मिळू लागल्याने या महिला रेड लाईट मधून बाहेर पडले आहेत आज ४० महिला डॉ स्वती खान यांच्या श्री साई सेवा संस्थेच्या माध्यमातून पालिका आयुक्त डॉ पंकज आशिया याना भेटून पालिकेच्या माध्यमातून हनुमान टेकडी या भागात असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांची वस्ती असून तेथील परीसरात नादुरुस्त रस्ते , पाणी पुरवठा ,सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली तर या ठिकाणी येथील महिलांच्या विविध आजारा सोबत बालरोग तज्ञ् , मधुमेह , रक्तदाब व इतर रक्त तपासणी करून या महिलांना दिलासा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले हनुमान टेकडी येथील महिलांना साठी सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या माध्यमातुन महिलांचे देहविक्री व्यवसायातून मन परिवर्तन घडवून आणण्यात यश आले.श्री साई सेवा संस्थेच्या माध्यमातून टाकाऊ कचऱ्या पासून विविध दिवे ,लॅम्प ,शोभिवंत आभूषणे सुरू करण्याचे प्रशिक्षण करून व्यवसाय सुरू केला असून येथील इको लाईट स्टुडिओ या महिला सक्षमीकरण केंद्राची स्थापना करून कचऱ्या पासून शोभिवंत वस्तू निर्मितीचा उपक्रम सुरू केल्याने देह व्यापार करणाऱ्या  या महिलांना त्या नरकयातना सहन कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेतून बाहेर काढून त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनवून समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करून देण्याचे कार्य उभे केले आहे ते कौतुकास पात्र असून अशा कार्यासाठी शासकीय पातळीवर जी काही मदत करणे शक्य असेल ती मदती देण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी दिले .


येथील महिलांना वापरून फेकून दिलेल्या कॉफी भुकटी पासून विविध आकाराचे आभूषणे व आकर्षक दिवे बनविण्याचे प्रशिक्षण डॉ बिपीन देसाई या दाम्पत्यांनी दिले असून येथे सध्या प्राथमिक स्तरावर महिलांकडून रंगरंगोटी व सजावट केली जात असून हे उत्पादन लवकरच विविध संस्थांच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका डॉ स्वाती सिंग खान यांनी दिली आहे .


        करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉक डाऊन काळात देहव्यापार करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांच्या मदतीला धावले डॉ स्वाती खान .त्यांच्या सततच्या पाठपुराव्या नंतर या भागातील २६० घरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ५५६ देहव्यापार करणाऱ्या महिलांसाठी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनीधान्य ज्यामध्ये तांदूळ ,पीठ ,मीठ, तेल,मसाला ,डाळ अशा साहित्याचे पॅकेट उपलब्ध करून दिले असता,नव्याने लॉक डाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढल्याने या महिलांसाठी त्यांनी पुन्हा एकदा स्वयंमसेवी संस्थेच्या माध्यमातून धान्य वितरण केले असून येथील एक ही महिला भुकेली राहणार नाही याची खबरदारी स्वाती खान या घेत आहेत . अशी समाजसेवा करणाऱ्या डॉ स्वाती खान ह्या समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या त्याच्या या संस्थेस महिला दीना निमित्त मनाचा मुजरा

Post a Comment

0 Comments