पोटे विद्यालयात दिला सावित्री बाईंच्या स्मृतींना उजाळा

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील कै. भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीबाईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा प्रत्यक्ष  सन्मान करण्यात आला. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोटे शैक्षणिक समुहाचे बिपीन पोटे, केम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूलच्या मीनल पोटे, कवियत्री आणि लेखिका सुरेखा गावंड, लेखिका नूतन बांदेकर, मल्लखांबपटू कोमल कानगुणे, गायिका स्नेहा कुलकर्णी दांडेकर, डॉ. सुरेखा जाधव, अभिनेत्री तपस्या नेवे, पत्रकार सचिन सागरे आदींनी कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वामन यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments