केडीएमसीच्या प्लास्टिक निर्मुलनाच्या मोहिमेस बालकांचा हातभार

   कल्याण , कुणाल म्हात्रे   : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात `शुन्य कचरा मोहिमप्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि पर्यावरणाच्या -हासास कारणीभूत होणा-या प्लास्टिकचे निर्मुलन व्हावे याकरीता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे अनेक संकल्पना राबविल्या. प्लास्टिक वापरावर`क्रिएट यू स्टुडिओया छोटया मुलांच्या सादरीकरण केलेल्या प्रशिक्षण वर्गात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घरातील प्लास्टिक गोळा करुन एका बाटलीत जमा केले.


हि माहिती उपायुक्त कोकरे यांना मिळताच त्यांनी या प्रशिक्षण वर्गात जाऊन तेथील मुलांचे कौतुक केले. अशाप्रकारे प्लास्टिक निर्मुलनाच्या महापालिकेच्या मोहिमेस घराघरातील बालकांनी हातभार लावला असून प्लास्टिक निर्मुलनासाठी सर्वांनी सहयोग देऊन महापालिकेच्या शुन्य कचरा मोहिमेस सहकार्य करावेअसे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments