डीमार्ट मध्ये सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने डीमार्ट पाच दिवसासाठी सील यापूर्वीही पोलिसांनी केली कारवाई होती कारवाई
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : केडीएमसी क्षेत्रत बुधवारी एका दिवसात ५९३ रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाने महापालिका क्षेत्रत थैमान घातल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा दिवसात जवळपास ३ हजार रुग्ण वाढले आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेकडून व्यापारी आणि दुकानदारांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. कल्याणमधील गजबजलेल्या डी मार्ट मध्ये तपासणी केली असता ११० पैकी सहा कर्मचारी हे कोरोना पॉङिाटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे डीमार्ट पाच दिवसांकरीता सील करण्यात आले असून अन्य कर्मचा:याना क्वारंटाईन केले आहे.


लॉकडाऊनच्या भितोपोटी त्याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. पोलिसानी कारवाई करुन सुद्धा डी मार्टमध्ये लोक खरेदीसाठी जमत होते. आत्ता कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात अन्य किती लोकं आले आहेत याचा अंदाज मिळून येत नसल्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments