जागतिक महिला दिन निमित्त नगरसेविका नंदिनी विचारे त्यांच्या कडून ठामपाच्या महिला बस वाहकांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

 


ठाणे, प्रतिनिधी  :  दरवर्षी सिद्धेश्वर तलाव परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक महिला दिन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाच्या नियमानुसार कमी उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील 30 महिला बस वाहकांचा (कंडक्टर) सत्कार ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.


 या कार्यक्रमाला उपमहापौर पल्लवी कदम, संपर्कप्रमुख संध्या वढावकर, महिला संघटक मीनाक्षीताई शिंदे, नगरसेविका परीषा सरनाईक, प्रादेशिक परिवहन विभागाचे माजी परिवहन अधिकारी नाईक साहेब, परिवहन सभापती विलास जोशी, माजी परिवहन सदस्य राजेश मोरे, राजेंद्र महाडिक अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष विद्याताई शिंदे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महिला सक्षमीकरणासाठी नगरसेविका नंदिनी विचारे कायम प्रयत्नशील राहिलेल्या आहेत त्यांनी आपल्या प्रभागातील गरजू  महिलांना बाहेर काढून त्यांना एकत्रित रिक्षाचालकांची ट्रेनिंग देऊन अबोली रिक्षा चालक महिला ठाण्यात तयार केल्या याचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक करण्यात आले नगरसेविका नंदिनी विचारे यांनी दुसरा टप्प्यात ७० महिलांना बस कंडक्टरचे संपूर्ण प्रशिक्षण देऊन ठाणे प्रादेशिक परिवहन तर्फे कंडक्टर बॅच काढून दिले. 


व त्यापैकी ३० महिला वाहकांना (कंडक्टर) म्हणून ठाणे महानगर पालिकेच्या नव्याने सुरू झालेल्या तेजस्वीनी बसच्या सेवेत ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे तसेच महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकार्याने अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ठाणे महानगर पालिकेच्या बस सेवेत रुजू करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केलेले आहेत नगरसेविका नंदिनी विचारे यांनी आपल्या प्रभागात विकास कामांबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराकडे लक्ष केंद्रित केलेले आहे.

Post a Comment

0 Comments