कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासनाने सज्ज रहावेग्लोबल हॅास्पीटल येथे सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आदेश


 


ठाणे,प्रतिनिध, , कोविड 19 ची दुसरी लाट आल्यानेशहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागलीआहेही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठीठाणे महापालिकेने सज्ज रहावे अशा सूचना ठाणेजिल्ह्याचे पालकमंत्री नाएकनाथ शिंदे यांनीआज झालेल्या विशेष बैठकीत दिल्या.त्याचबरोबर ठाणे ग्लोबल कोविड हॅास्पीटलआणि पार्किंग प्लाझा रूग्णालय येथे तातडीनेसीटीस्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेशही त्यांनीया बैठकीत दिले.


          कोविडच्या इतर रूग्णांबरोबरच कोविडचीलागण झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेषव्यवस्था तसेच सहव्याधी रूग्णांची काळजीघेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनालादेतानाच मास्क  वापरणाऱ्यांविरूद्ध कठोरकारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.


          दरम्यानगृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेवून अशा रुग्णांच्याहातावर शिक्का मारुन त्यांच्या संपर्कात आलेल्याव्यक्तींचा शोध घेणे आणि जास्तीत संशयित रुग्णविलगीकरण कक्षात दाखल होतील या दृष्टीनेमहापालिकेने कटाक्षाने कार्यवाही करावी अशासूचनाही नाशिंदे यांनी दिल्या.


            मागील महिन्याभराच्या काळामध्येकोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतआहेया अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मकउपाययोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी आजमहापालिकेतील कैनरेंद्र बल्लाळ सभागृहातमहापौर नरेश म्हस्के यांनी बैठकीचे आयोजन केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस खासदार राजन विचारे, उपमहापौर सौपल्लवी कदम,सभागृहनेते अशोक वैतीविरोधी पक्षनेते अशरफपठाणआरोग्यसमिती सभापती सौनिशा पाटील,माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अध्यक्ष भूषणभोईरशिवसेना गटनेते दिलीप बारटक्के,नगरसेवक गुरमुखसिंग स्याननारायण पवार,सुनेश जोशी उपस्थित होतेतर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुखउपायुक्तसंदीप माळवीअशोक बुरपल्लेविश्वनाथकेळकरवर्षा दिक्षीतअश्विनी वाघमळेमाहिती जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर वैद्यकीयआरोग्य अधिकारी राजू मुरूडकरआरोगयअधिकारी अनिरुध्द माळगांवकरडॉखुशबूटावरी आदी उपस्थित होते.


            मागील वर्षी पेक्षा यावेळेस कोरोनासंक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत असूनरुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे,ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करीत सर्वप्रशासन यंत्रणा  लोकप्रतिनिधींनी देखीलसक्षमपणे काम करण्याचे आवाहन यावेळीपालकमंत्री नाएकनाथ शिंदे यांनी केलेयाकामीसुरू करण्यात आलेले कोविड सेंटर सर्वताकदीनिशी कार्यान्वित करण्याचे आदेश दिलेयासेंटर आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्सऔषधसाठा,रेमडेसिवीर  आवश्यक सोईसुविधा उपलब्धकरण्याबाबत सूचित केले.   


          याचबरोबर लसीकरण केंद्रे वाढवूनजास्तीत जास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्नकरावेतयासाठी मनुष्यबळाची संख्या वाढवावी.तसेच होम कोरंटाईन केलेल्या रुग्णांवर शिक्केमारुन तो रुग्ण घराबाहेर पडणार नाही याबाबतत्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसारवैद्यकीय तपासणी करण्यात यावी यासाठी तज्ज्ञडॉक्टर सज्ज करण्यात यावेतयापूर्वी कार्यान्वितकेलेली विलगीकरण कक्ष सज्ज करुन याठिकाणी दैनंदिन साफसफाईआवश्यकऔषधपुरवठातज्ज्ञ डॉक्टर्सभोजनाची व्यवस्थाहोईल या दृष्टीने प्रशासनाने काम करावेतसेचज्या विभागात रुगण सापडत आहेततेथीलनागरिकांमध्ये जनजागृती होणेसाठी होर्डिंग्जलावणेकोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावीयासाठी शहरातील होर्डिंग्जवर कोविड वॉर रुमचेदूरध्वनी क्रमांक देवून संपर्क साधण्याचे आवाहन करावे.


          ठाणे महापालिकेचा कोविड वॉर रुम हा अद्ययावत असून रुग्णांना संपर्क साधल्यास तात्काळ सेवा पुरविली जाते, परंतु रुग्णांनी या वॉर रुमपर्यत पोहचणे आवश्यक असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. अत्यंत चांगल्या प्रकारे ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहिम चालू असून लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, प्रभागनिहाय सर्वच लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे काम करीत असून यापुढे देखील समन्वयाने करावे असे देखील महापौर यांनी यावेळी नमूद केले. तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्वरीत उपलब्ध होईल या दृष्टीने देखील स्वतंत्र डेस्क तयार करण्याबाबतही महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला सूचित केले.


            कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वविभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्यप्रकारेकरणेआवश्यकतेनुसार औषधफवारणी करणेतसेच जे नागरिक मास्क वापरत नाही त्यांच्यावरनियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे,वेळप्रसंगी पोलीसांची मदत घेणे तसेच रात्री 8नंतर लागू संचारबंदीचे पालन होत आहे की नाहीयासाठी गस्त वाढविणेआवश्यकतेनुसारमार्शलची नियुक्ती करण्याबाबत पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या.


          कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठीदाखल करता यावे रुग्ण्वाहिकांची संख्यावाढविणेआवश्यकतेनुसार परिवहनच्या बसेसचेरुग्णवाहिकेत परिवर्तीत करणेतसेचउपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचीसीटीस्कॅन करण्यासाठी ग्लोबल कोविड सेंटर,पार्किंग प्लाझा येथे सीटीस्कॅनची मशीन उपलब्धकरणेजेणेकरुन रुग्णांना इतरत्र जावे लागणारनाही  रुग्णांवर योग्य उपचार करणे सोईचे होईलया दृष्टीने कार्यवाही करावी आदी सूचना देतअसतानाच या सूचनांची अंमलबजावणी देखीलतातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री नाएकनाथशिंदे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments