भिवंडीत युवकाची गळ फास घेऊन आत्महत्या


 

भिवंडी दि.१९ (प्रतिनिधी ) तालुक्यातील वडपे गावातील एका तरुणाने राहत्या घरातील छताच्या लाकडी कडीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसले तरी त्याने प्रेमसंबंध अथवा आर्थिक व्यवहारातून आत्महत्या केली असावी का ? 


            या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.जितेश बळीराम तारे (२१ रा. वडपे)असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे.तो सकाळी बँकेत गेला होता.त्यानंतर त्याने आरटीओ कँपमध्ये ड्रायविंग लायसंसाठी चाचणी देऊन घरी आला.व घरातील बेडरूमच्या दरवाजाची कडी लावून लाकडी कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. उशिरापर्यंत जितेशने दरवाजाची कडी उघडून तो बाहेर आला नाही.


          
          त्यामुळे कुटुंबीयांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता जितेश याचा मृतदेह साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले.या आत्महत्येची माहिती तात्काळ तालुका पोलिसांना देण्यात आली असता पोलीस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.पुढील करवाईसाठी मृतदेह स्व .इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments