कल्याण डोंबिवली मध्ये दुकाने रात्री ८ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  संपूर्ण राज्यासह कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही कोरोना रुग्णांची संख्या प्रती दिन वाढतच आहे. या वर काही प्रमाणात का होईना पण आळा बसावा या उद्देशाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दुकानदार आणि व्यापाऱ्यांवर पालिका प्रशासनाने निर्बन्ध लागू  केले आहेत . 


या आदेशा नुसार ११ मार्च पासून जिवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता बाकी सर्व दुकानदार आणि अस्थापनांना सकाळी ७ ते सायं . ७ वाजेपर्यंतच दुकाने आणि अस्थापना उघडी ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला होता परंतु या आदेशाला बहुतांशी व्यापारी आणि दुकानदारांनी विरोध दर्शविल्याने आणि वेळेत बदल करण्याची लेखी मागणी केल्याने सोमवारी सायंकाळी पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी दि ११ मार्च च्या आदेशात सुधारणा करून नवीन आदेश पारित केला आहे . या सुधारीत आदेशानुसार आता दुकानदारांना सकाळी १० ते रात्री ८ वाजे पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे .सोमवारी सायंकाळी पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी पारित केलेल्या आदेशानुसार नागरीकांना जिवनावश्यक वस्तू खरेदी करणे सोईचे व्हावे तसेच वाणिज्य अस्थापनांना आपल्या व्यवहारात सुसुत्रता आणता यावी या साठी सकाळी १० ते रात्री ८ असा वेळेत बदल केल्याचे नमुद करण्यात आले आहे .दरम्यान दि १० मार्च रोजिच्या आदेशा प्रमाणे प्रत्येक शनिवार – रविवार पी १ पी २ प्रमाणेच दुकाने चालु ठेवण्याची कार्यप्रणाली कायम ठेवण्यात आल्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments