Header AD

कंपनीच्या आवारातच केमिकल सांड पाण्यावर मायक्रो ऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीत
डोंबिवली (शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी मधील जवळपास ९० टक्के कारखान्या मध्ये केमिकल मिश्रित सांडपाणी हे सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यत वाहून आणताना एमआयडीसीचे नाले उघडे असल्यामुळे नागरिकांना प्रदुषणाचा त्रास होतो. औरंगाबाद येथील यश फाउंडेशन यांनी तयार केलेल्या बायोनेस्ट पद्धतीचा प्रकल्प  प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. औरंगाबाद येथील यश फाउंडेशन यांनी तयार केलेल्या बायोनेस्ट पद्धतीचा प्रकल्प  प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. 


हा प्रयोग यशस्वी झाल्यास सुरुवातीला १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कामाकडून हा प्लांट उभारला जाईल आणि त्याच्या निकालाचे निरीक्षण केल्यानंतर एमआयडीसी मधील जास्तीत जास्त कंपन्यामध्ये हा प्लांट कार्यान्वित केला जाणार आहे. संपूर्णपणे नैसर्गिक रित्या होणाऱ्या या शुधीकरण प्रकल्पात विजेचा किंवा कोणत्याही महागड्या मशिनरीचा वापर केला जात नसल्यामुळे हि कमी खर्चिक आणि लाभदायक प्रक्रिया ठरणार असल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीतील सांडपाणी प्रकिया केंद्रात हा प्रयोग राबविला जाणार आहे. गुरुवारी डोंबिवलीतील सांडपाणी उदंचन प्रकिया  केंद्रात या प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.


 यावेळी औरंगाबाद येथील यश फाउंडेशनचे संचालक यश पटेल, नरेद्र पटेल,कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, सदस्य उद्य वालावलकर,राजू बैलूर,डॉ. आनंद आचार्य,व्ही.के.कन्नन,श्रेयस आचार्य,ऋषभ बैलूर,आनंद जयवंत,अमेय कामत,मुरली अय्यर,नारायण टेकाडे, डॉ.निखील धूत,कमल कपूर,चांगदेव कदम आणि राहुल कासलीवाल उपस्थित होते.डोंबिवली सांडपाणी उदंचन प्रकिया केंद्रात डोंबिवली एमआयडीसी मधील कारखान्यामधील केमिकल मिश्रित सांडपाणी तयार होते.


या सांडपाण्यावर एकत्रित पणे उद्चन केंद्रात प्रक्रिया करून ते खाडीत सोडले जाते. सांडपाणी उद्चन केंद्रात दररोज १५ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात असून त्यासाठी दिवसाला १ लाख ५० हजार खर्च केला जातो. मात्र हे सांडपाणी केंद्रापर्यत वाहून आणताना एमआयडीसीचे नाले उघडे असल्यामुळे नागरिकांना प्रदुषणाचा त्रास होतो. यामुळेच औरंगाबाद येथील यश फाउंडेशन यांनी तयार केलेल्या बायोनेस्ट पद्धतीचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला आहे.


या प्रक्रियेत सांडपाण्यातील रसायनांवर जगणाऱ्या सूक्ष्म जीवाचा वापर करण्यात आला आहे. हे सूक्ष्मजीव मातीत मिसळवत कंपन्यातील घातक पाणी या प्लांटमध्ये ठरावीक प्रेशरने सोडले जाते.हे सूक्ष्मजीव सांडपाण्यातील केमिकल फस्त करतात. मातीत मुरलेले हे पाणी पुन्हा पाईपच्या मदतीने तशाच दुसर्ऱ्या आणि नंतर तिसऱ्या प्लांटमध्ये सोडले जाते. या प्रक्रियेत हे सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे केमिकल आणि रंग देखील फस्त करतात. ज्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मर्यादेत किंवा त्यापेक्षा कितीतरी कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. 


सांडपाणी उद्चन केंद्राच्या परिसरात हा प्लांट प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास सुरुवातीला १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कामाकडून हा प्लांट उभारला जाईल आणि त्याच्या निकालाचे निरीक्षण केल्यानंतर एमआयडीसी मधील जास्तीत जास्त कंपन्यामध्ये हा प्लांट कार्यान्वित केला जाणार आहे. संपूर्णपणे नैसर्गिक रित्या होणाऱ्या या शुधीकरण प्रकल्पात विजेचा किंवा कोणत्याही महागड्या मशिनरीचा वापर केला जात नसल्यामुळे हि कमी खर्चिक आणि लाभदायक प्रक्रिया ठरणार आहे.

कंपनीच्या आवारातच केमिकल सांड पाण्यावर मायक्रो ऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीत कंपनीच्या आवारातच केमिकल सांड पाण्यावर मायक्रो ऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीत Reviewed by News1 Marathi on March 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads