महिला दिना निमित्त दिव्यात रेल्वे महिला चालकाचे स्वागत

 दिवा ( शंकर जाधव )  जागतिक महिलादिना निमित्त ठिकठिकाणी दिवा स्टेशनात  संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटना, आम्ही दिवा रेल्वे प्रवासी आणि तन्वी फाऊंडेशनच्या महिलांनी मुमताज या रेल्वे महिला चालकाचे स्वागत करण्यात आले. संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटना, आम्ही दिवा रेल्वे प्रवासी आणि तन्वी फाऊंडेशनच्या महिलांनी केले.          संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेच्या संगिता भोईर यांनी पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या श्रावणी गावडे यांनी मुमताजला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुमताज यांना  तन्वी फाऊंडेशन तर्फे कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर दिवा स्टेशनवरील पोलीस दलातील महिला, सफाई कर्मचारी, उद्घोषणा करणाऱ्या महिला, रेल्वे फाटका वरील महिला कर्मचारी याना ही गुलाबाचे फुल देऊन सन्मान करुन त्यांच्या कामाचे कौतुक केले. 

Post a Comment

0 Comments