पॅन्‍टीन इंडियाची नवीन ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर कायरा अडवाणी तरूणींना केस गळण्‍याची चिंता न करता खुले सोडण्‍यास प्रोत्‍साहित करणार
मुंबई, २० मार्च २०२१ :  आघाडीचा हेअर केअर ब्रॅण्‍ड पॅन्‍टीनने (Pantene) बॉलिवुड सेलिब्रिटी कायरा अडवाणीसोबत नवीन मोहिम सादर केली आहे. या मोहिमेअंतर्गत तरूणींना त्‍यांचे केस गळण्‍याची चिंता न करत आत्‍मविश्‍वासाने खुले सोडण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍यात येणार आहे. नवीन जाहिरात दाखवण्‍यात आले आहे की तरूण मुली त्‍यांच्‍या केसगळतीच्‍या समस्‍येमुळे केस बांधून ठेवतात. कायरा अडवाणीसोबत सहयोगाने पॅन्‍टीन 'केस बांधून ठेवण्‍यासाठी लांब वाढवलेले नाहीत' या गोष्‍टीवर भर देते. 


ग्राहकांचे केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास येते की देशभरातील ५० टक्‍क्‍यांहून अधिक महिलांना केसगळतीचा त्रास आहे. पॅन्‍टीनच्‍या अडवान्‍स हेअर फॉल सोल्‍यूशनमध्‍ये (Pantene’s Advanced Hair Fall Solution) प्रो व्हिटॅमिन बी५ व फर्मेन्‍टेड राइस वॉटर आहे, जे फक्‍त १४ दिवसांमध्‍ये केसगळती कमी करते. नियमित वापरासह केस गळणे, नुकसान होणे अशा समस्‍यांची चिंता न करता खुले ठेवता येऊ शकतात.  


टिन्‍सेल टाऊनमधील सर्वात यशस्‍वी सिता-यांमध्‍ये उदयास येत असलेली कायरा अडवाणी म्‍हणाली, ''मी नेहमीच लांब केस ठेवते, पण आपणा सर्वांना केसगळतीचा सामना करावा लागतो. पॅन्‍टीनचे प्रमाणित सोल्‍यूशन्‍स प्रो व्हिटॅमिन बी५ व फर्मेन्‍टेड राइस वॉटरने संपन्‍न आहेत, जे तुम्‍हाला चमकदार, मुक्‍त आणि हेअर-फॉल-फ्री केस देतात. मला पॅन्‍टीनची नवीन ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर असण्‍याचा आनंद होत आहे आणि मी केस आवडण्‍यासोबत त्‍यांना खुले ठेवायला आवडणा-या माझ्या सारख्‍या इतर महिलांना माझा प्रवास सांगण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.''  


पीअॅण्‍डजी हेअरकेअरच्‍या कंट्री लीडर बिनू निनान म्‍हणाल्‍या, ''आम्‍ही देशभरातील महिलांसोबत चर्चा केली आणि समजले की त्‍यांची मोठी समस्‍या म्‍हणजे केसगळती, ज्‍यामुळे ते केसांना खुले न ठेवता बांधून ठेवतात. पॅन्‍टीन प्रमाणित सोल्‍यूशन्‍ससह आमचा मनसुबा आहे की महिला केसगळतीचा विचार न करता त्‍यांचे केस खुले ठेवू शकतात. आम्‍हाला कायरा अडवाणीची निवड करण्‍याचा आनंद होत आहे, जी सर्व तरूणींसाठी एक आदर्श आहे.'' 


पॅन्‍टीन प्रगत हेअर फॉल सोल्‍यूशन्‍स (hair fall solutions) देते, ज्‍यामध्‍ये तरूणींसाठी सर्व प्रकारच्‍या केसांकरिता पॅन्‍टीन शॅम्‍पू, कंडिशनर, ओपन हेअर मिरॅकल क्रीम आणि २-इन-१ शॅम्‍पू + कंडिशनर श्रेणीचा समावेश आहे आणि ही उत्‍पादने ऑनलाइन आणि तुमच्‍या जवळच्‍या स्‍टोअर्समध्‍ये सहजपणे उपलब्‍ध आहेत. 

Post a Comment

0 Comments