खडवलीत नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह ३६ तासानंतर पत्नीच्या हवाली
भिवंडी दि ६ (प्रतिनिधी  )  भिवंडी पडघा लागत असलेल्या खडवली नदीत मौज मजा करण्यासाठी   कुटूबासह आलेल्या पाच जण नदीत उतरले मात्र   दोघाना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली तब्बल ३६ तासांनी खडवली पासून १० किलो मीटर व त्या दोघांच्या मृतदेह मिळाले पोलिसांनी श्वविच्छेदना साठी इदिरा गांधी रुग्णालयात आणले असून खडवली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मोहम्मद शफिक ( वय ३३) व , नफीस अहमद शेख ( वय ४०)  असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत . आपल्या  मित्रांसोबत गुरुवारी सायंकाळी  ५ जण खडवली नदीत मौज माजा करण्यासाठी  खडवली नदी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले खडवली पासून दहा किलो मीटरवर या दोघांचे मृत देह  आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिळाले मात्र ३६ तास नंतर त्याच्या पत्नीला आपलया पतीचे मृतदेह ताब्यात मिळाले

Post a Comment

0 Comments