ठाण्यात क्रिकेट प्रेमींचा आय.पी.एल.चा पहिला प्रयत्न एस.व्हि.संघाने पटकाविला APL 2021 चषक
ठाणे , प्रतिनिधी  ;   ठाण्यातील खारकर आली,  महागिरी, पोलिस लाईन,टेम्भी नाका परिसरातील क्रिकेट क्षेत्रातील काही तरुणाची याच परिसरातील क्रिकेट खेळाडूंना एकत्र करून आय.पि.एल.च्या धर्तीवर क्रिकेट सामने खेळवले होते,ठाण्यातील हा पहिलाच प्रयत्न होता.दोन दिवस खारकर आळीतील सार्वजनिक मैदान बचाव समितीच्या मैदानात चालू असलेल्या स्पर्धेत याच परिसरातील सचिन शिंदे व विशाल वाघ यांच्या मालकीच्या एस.व्ही.वाॅरीयर्स या संघाने पटकावून पहिल्या चषकाचा मानकरी ठरला.


               मुंबईतील आय.पी.एल च्या धर्तीवर निखिल बुडजुडे,संदेश कवितके,नितेश पाटोळे व योगेश क्षीरसागर या क्रिकेटप्रेमी तरूणांनी या परिसरातील क्रिकेट क्षेत्रातील सर्व जाणकारांच्या मदतीने विविध संघ तयार केले व दोन दिवसीय ""APL 2021 "" क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते, आय.पि.एल.सारखेच वातावरण याठिकाणी पहायला मिळत होते,युट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह सामने दिसत होते.एकूण आठ संघ वेगवेगळ्या संघातून खेळणारे खेळाडूंचे लाॅटरी पद्धतीने निश्चित करण्यात येऊन परिसरातील मान्यवरांनी याला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रायोजकत्व स्वीकारले होते.


          स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाला दोन दिवसीय स्पर्धेत एकूण 16 सामने झाले अंतिम सामन्यात एस.व्ही.संघाच्या हितेश नागरे,तुषार महाजन यांच्या फलंदाजीच्या व इम्रोज खान व भाविक जैन यांच्या भेदक गोलंदाजीच्या सहाय्याने एस.पी.वाॅरियर या संघावर विजय मिळवून पहिल्या वाहिल्या APL 2021 चषकावर शिक्कामोर्तब केले.


              पारितोषिक वितरण समारंभात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मधुकर कोळी,सचिन चव्हाण,निखिल बुडजडे,सचिन शिंदे,निलेश कोळी,राहुल क्षीरसागर, अस्लम मुजावर,संजय(भाउ) पाटील,निलेश पाटोळे,विशाल वाघ,चैतन्य प्रधान,विनायक भुजबळ,इम्रान कुरेशी,नीरज यादव,हेमंत बुचडे,इम्रान कुरेशी,सचिन भोसले,इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments