जिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्येठाणे, प्रतिनिधी  :-  खासदारांच्या पाहणी दौरा नंतर जिल्हा परिषद तर्फे जून अखेर पर्यंत शाळेचे काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले होते पण जिल्हा परिषदेकडे निधीच उपलब्ध नसल्याने ते आश्वसनाची पुरतात कशी करणार याची पाहणी करण्यासाठी माजी विदयार्थी संघटना व पारशी ट्रस्ट ने बी.जे.हायस्कुल ची पाहणी केली त्यात शाळेचे बरेचसे काम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले पण जर निधी मिळाला नाही तर काम पूर्ण होईल का अशी शंका आम्हाला आहे.


कॉन्ट्रॅक्टर समीर देसाई यांनी सांगितले की कालच जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे कामानुसार निधी उपलब्ध करण्यात येणार आहे असे सगळ्यात आले 


बैरामजी जिजिभोय यांनी ही शाळा तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू केली आहे ही वास्तू पूर्ण झल्या नंतर शासनाने आपल्या ताब्यात ठेऊन ही शाळा कोणत्याही वैयक्तिक संस्थेला देऊ नये व जर द्यायची असेल तर सर्वप्रथम पारशी ट्रस्टला देण्यात यावी कारण पारशी ट्रस्ट यांनी ही जागा डोनेट केली आहे आणि शाळा चालवण्यासाठी ट्रस्ट पूर्ण पणे सक्षम आहे यामध्ये सर्व सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा असे पारशी ट्रस्टचे अध्यक्ष परसी करणी व माजी मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत 


ही शाळा लवकरात लवकर बांधण्यात यावी यासाठी माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टने उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टने शाळेच्या बांधकामासाठी 35 वर्ष संघर्ष केला आहे वारंवार राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याशी पत्रव्यवहार करून शाळेच्या बांधकाम संधार्भात विचारला करण्यात आली होती. ह्या शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन सर्व सामान्य विद्यार्थ्यांना यात प्रवेश मिळावा असेच माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्ट यांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments