Header AD

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त रेशनकार्ड शिबीर परिवहन सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये भव्य रेशनकार्ड शिबिराचे आयोजन परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांच्यावतीने करण्यात आले होते. सामान्य नागरिकांना रेशनकार्ड संदर्भात अनेक तक्रारी असतात. रेशनकार्डमध्ये अनेक सुधारणा करायच्या असतात. मात्र रेशनकार्ड कार्यालयात होणाऱ्या गर्दी आणि विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्ड संबंधी कामे करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला होता.


नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी प्रभाग क्र. ४५ कचोरे येथे भव्य रेशनकार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात अर्ज वितरण, रेशनकार्ड आधारकार्ड लिंक, पत्ता बदल करणे, नवीन रेशनकार्ड बनविणे, नाव कमी करणे किंवा वाढवणे आदी कामे करण्यात आली. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा झाला.


 यावेळी परिवहन समिती सदस्य अनिल पिंगळे, विभाग प्रमुख सुभाष गायकवाड, शाखा प्रमुख हरिश्चंद्र म्हात्रे, उपशहर अधिकारी कमलाकर चौधरी, उपविभाग अधिकारी राहुल चौधरी, उपशाखा प्रमुख संतोष वाघमारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.        
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त रेशनकार्ड शिबीर परिवहन सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त रेशनकार्ड शिबीर परिवहन सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads