Header AD

सिनियॉरिटी कडून ज्‍येष्‍ठ नागरिकां साठी डिजिटल एंगेजमेंट अॅप 'एव्‍हरग्रीन क्‍लब' सादरवृद्धांच्‍या मानसिक आरोग्‍याला साह्य करण्‍यासाठी नवीन व अद्वितीय ऑनलाइन व्‍यासपीठ 


मुंबई , जानेवारी २०२१ : जागतिक आरोग्‍य संघटनेने (डब्‍ल्‍यूएचओ) सादर केलेल्‍या अहवालानुसार भारतातील जवळपास ५७ दशलक्ष लोकांना औदासिन्‍यतेचा त्रास आहे आणि आणखी ३८ दशलक्ष लोक चिंता संबंधित आजारांनी पीडित आहेत. अनपेक्षित महामारीमुळे या आकडेवारीमध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. महामारीचा सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींवर, विशेषत: ज्‍येष्‍ठ नागरिकांवर परिणाम झाला आहे. मागील काही महिन्‍यांमध्‍ये ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या मानसिक आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.


वृद्धांचे मानसिक आरोग्‍य लक्षात घेत सिनियॉरिटी या वृद्धांसाठी भारतातील सर्वात मोठ्या खरेदी गंतव्‍याने विशेषत: देशाच्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी डिजिटल व्‍यासपीठ 'एव्‍हरग्रीन क्‍लब' सादर केले. ही अनोखी ऑफरिंग आकर्षक कार्यक्रमांना उपस्थित राहत आणि नवीन अर्थपूर्ण संबंध निर्माण करत ज्‍येष्‍ठ नागरिकांमध्‍ये नवीन स्‍वावलंबी भावना निर्माण करण्‍यास मदत करण्‍यासाठी सादर करण्‍यात आली आहे. https://bit.ly/39Sg15a 


एव्‍हरग्रीन क्‍लब हे वेब व अॅप-आधारित व्‍यासपीठ आहे, जे‍थे ५५ वर्षे वयावरील लोक समविचारी लोकांसोबत 'ई-मीट' करू शकतात आणि समान आवड असलेल्‍या विषयांवर चर्चा करू शकतात. ते अंताक्षरी, तंबोला, ओपन माइक, कराओके इत्‍यादींसारखी इंटरअॅक्टिव्‍ह सत्रे, तसेच बागकाम, योगा, नृत्‍य, थेरपी, हस्‍तकला अशा अध्‍ययन-आधारित तज्ञ सत्रांमध्‍ये देखील सहभाग घेऊ शकतात. धमाल मनोरंजनपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेण्‍यासोबत ते सर्जनशील छंद जोपासू शकतात आणि त्‍यांच्‍या घरामधूनच आरामशीरपणे नवीन प्रतिभांना वाव देऊ शकतात. हे व्‍यासपीठ त्‍यांना त्‍यांच्‍याशी संबंधित ब्‍लॉग्‍स व वेबिनार्स सारखे विशेष कन्‍टेन्‍ट देखील उपलब्‍ध करून देते. 


प्‍ले स्‍टोअर लिंक: https://bit.ly/3o6NGwS

अॅप स्‍टोअर लिंक: https://apple.co/2Y1JtQt 

सिनियॉरिटी कडून ज्‍येष्‍ठ नागरिकां साठी डिजिटल एंगेजमेंट अॅप 'एव्‍हरग्रीन क्‍लब' सादर सिनियॉरिटी कडून ज्‍येष्‍ठ नागरिकां साठी डिजिटल एंगेजमेंट अॅप 'एव्‍हरग्रीन क्‍लब' सादर Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads