Header AD

डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने १५० फुटाचा तिरंगा फडकला

 डोंबिवली ,  शंकर जाधव  : येथील पूर्वेकडील दत्तनगर चौकात शिवसेनेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी १५० फुट तिरंगा फडकविण्यात आला. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या यांनी फडकणाऱ्या ध्वजाचे लोकापर्ण केले.माजी नगरसेवक राजेश मोरे आणि माजी नगरसेविका भारती मोरे यांनी या हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे,शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी महापौर विनिता राणे माजी नगसेवक मंदार हळबे, नागरीक आणि शिवसैनिक, पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या दिमाखदार सोहळ्यातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.तर आंबिवली येथील बॅडपथकानेउत्तम वाद्ये वाजवून उपस्थितांची मने जिंकली.प्रसिद्ध कलाकार सतीश नायकोडी यांनी उत्कृष्ट निवेदन केले. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या यांनी फडकणाऱ्या ध्वजाचे लोकापर्ण केले.यांनतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. विकास काटदरे यांच्या पत्नीस शिवसेने शहर शाखेच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. 


तर माजी सैनिकांचेही सत्कार ककरण्यात आले.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाषण केले. यावेळी माजी नगरसेवक राजेश मोरे म्हणाले,दत्तनगर प्रभागात शासनाच्या केंद्र शासनाद्वारे जेएनएनयूआरएम अंतर्गत राबवण्यात आलेली घरकुल योजनेतील सुमारे २५१ लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत.याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी विनंती मोरे यांनी केली. यावर पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरे मिळावी म्हणून तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत,प्रत्येक लाभार्थ्यांना घरे मिळतील असे जाहीर आश्वासन दिले.

डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने १५० फुटाचा तिरंगा फडकला डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने १५० फुटाचा तिरंगा फडकला Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads