Header AD

सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण पिसवली तील जीआरसी शाळेचा अभिनव उपक्रम

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  भारताचा प्रजासत्ताक दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र हा प्रजासत्ताक दिन साजरा करतांना कल्याण मध्ये वेगळेपण पाहायला मिळाले. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून गेल्या वर्षभरात अविरतपणे नागरिकांची सेवा करणाऱ्या सफाई कामगारांच्याहस्ते ध्वजारोहण करून एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील पिसवली येथील जी.आर.सी. हिंदी शाळेने हा अनोखा उपक्रम राबवीत एक नवा पायंडा पाडला आहे. शाळेच्या या संकल्पनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


       गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असतांना नागरिकांच्या सेवेसाठी काहीजण मात्र अहोरात्र झटत होते. यामध्ये डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी, खाजगी सुरक्षा रक्षक आदींचा समावेश होता. या सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जीआरसी शाळेने पिसवली गावातील सफाई कामगार शाबाश भोईर, दिनेश भाने, सुरक्षा रक्षक  विश्वनाथ मांजरेकरडॉक्टर जेपी शुक्ला यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा देखील कोरोना काळात केलेल्च्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला.


आपले शरीर निरोगी असेल तर राष्ट्र दीर्घायू होईल. कोणत्या देशाने जगाला शस्त्र दिले तर कोणत्या देशाने जगाला आतंकवाद दिला, मात्र भारताने जगाला कोरोना वॅक्सीन दिलं असल्याची प्रतिक्रिया डॉ. जे पी शुक्ला यांनी दिली. तर अमेरिका निवासी किरीट पटेल यांनी भारताची प्रशंसा करत आपल्या भारत देशाची खूप आठवण येत असते. दरवर्षी आपल्या राष्ट्रीय सणांसाठी आपण भारतात येणार असल्याचेहि त्यांनी सांगितले. तर विवेकानंद पांडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत त्याबद्दल माहिती सांगितली.


      यावेळी अमेरिका निवासी किरीट पटेल,  समाज उद्धार समितीचे संस्थापक बबन चौबे, प्रदीप चौबे, विवेकानंद पांडे, दिनेश पाठक, हरी ओम सुरक्षा संस्थेचे रवि बोराडे, अक्षय बोराडे, ओम साई इंग्लिश स्कूलच्या  मुख्याध्यापिका अजंता राजन आदी मान्यवर उपस्थित होते. तर जीआरसी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला, वर्षां पाटील, जयश्री ठाकूर, सीमा पाठक, आदिती भोईर, करण पाल आदी शाळेच्या शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.   
सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण पिसवली तील जीआरसी शाळेचा अभिनव उपक्रम सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण पिसवली तील जीआरसी शाळेचा अभिनव उपक्रम Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads