Header AD

गेल्या २० वर्षात पॉजने वाचवले ३४७७ वन्यजीव

  

 


 

डोंबिवली (  शंकर जाधव ) पॉज संस्थेला गेल्या २०  वर्षात आतापर्यंत ३४७७ वन्यजीवांचे प्राण वाचविण्यास यश आले आहे.,यात११२०  साप२२८८ पक्षी१३ माकडे कोल्हे६० कासवे३१ विविध सरपटणारे प्राणी ज्यात घोरपडपालीरंग बदलणारे सरडे २० खारीवटवाघूळविंचू इत्यादी वन्यजीवांची सुटका करून पुनर्वसन केल्याची माहिती संस्थेचे निलेश भंगे यांनी दिली. २०१० मध्ये पॉज संस्थेने डोंबिवली मधील सर्पमित्रांची एक सभा देखील आयोजित करण्यात आली होती.२०१८  मध्ये भणगे ह्यांनी सर्प विषयक डेटावर   सर्प संमेलनात सादरीकरण केले होते.
      जागतिक २ ते ८ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहानिमित्त निलेश भणगे पॉज संस्थेविषयी माहिती दिली. भणगे म्हणाले, वाईल्ड अनिमल रेसक्यू नेटवर्क ह्या आशिया मधील मोठया कॉन्फरन्स मध्ये वेळोवेळी सहभाग घेऊन आपल्या कामाची माहिती दिली२००५  साली फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर कारवाई करून ठाणे जिल्ह्यातील सर्व गारुडी आणि मदारीकडून साप हस्तगत करून त्यांना मेटल आणि मातीचे साप देऊन पुनर्वसन केले. २००४  मध्ये नॅशनल सर्कसमधील १२ सिंह आणि  वाघ ह्यांची सुटका पेटा ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने केली आणि त्यांना बाणेरघट्ट बंगलोर येथे पाठवले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त पक्षी पॉज संस्थेकडे पुनर्वसनसाठी येतात. त्यामध्ये पाण्याजवळील पक्षीशहरी पक्षी,  जंगली पक्षीगवताळ पक्षी ह्यांचा समावेश असतो.
        अगदी स्थलांतरित पक्षी जसे फ्लेमिंगोचातकतीन बोटी खंड्या असे दुर्मिळ पक्षी देखील पॉज संस्थेने पुनर्वसीत केले आहेत. विविध बदकेबगळेसागरी ससाणे ते अगदी शहरातील कावळेचिमण्याकबुतरमैनाघारीकोकिळा ह्यांना वेळोवेळी वाचवले आहे. प्रत्येक प्रजनन काळात संस्थेने छोट्या पिल्लांना त्यांचा घरट्यात सोडण्याचे काम केले आहे. त्या पक्ष्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. विविध साप आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यासाठी संस्थेकडे (९९२०७७७५३) विशेष हेल्पलाईन आहे .संस्थेचे भणगे यांनी २००५ पासून पाळीव हत्ती ह्या विषयावर संशोधन केले असून महाराष्ट्र आणि गोवा मधील पाळीव हत्तींचा अभ्यास करून कोर्टामध्ये रिपोर्ट सादर केले आहेत. 
       रीसर्चचे पाच रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. ह्या मध्ये सर्कशीतील हत्तीमंदिर मधील हत्तीरस्त्यावरिल हत्तीझु मधील हत्ती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मधील हत्ती ह्याचा समावेश आहे. संस्थेकडे वन्यजीव ने-आण करण्यासाठी एक रुग्णवाहिका ही आहे.वन्यजीव सुरक्षा कायदा १९७२ बद्दल लोकांमध्ये जागरूकता करण्याचे काम ही संस्था गेली २० वर्षे अविरत करत आहे.

गेल्या २० वर्षात पॉजने वाचवले ३४७७ वन्यजीव गेल्या २० वर्षात पॉजने वाचवले ३४७७  वन्यजीव Reviewed by News1 Marathi on October 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads