Header AD

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्या वरील दुर्गाडी माता मंदिराची दारे भावीकांसाठी खुले
कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण खाडी किनारी छञपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा दुर्गाडी किल्ला आहे. याचं किल्ल्यावर असलेले दुर्गाडी मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. नवरात्रीच्या काळात कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर कल्याणच् नव्हे तर  ठाणे जिल्ह्यातून दुर्गाडी देवीच्या दर्शनसाठी  भक्ताची गर्दी होते. घटस्थापनेपासून ते दसर्या पर्यत मंदिरात मोठा उत्सव भरतो.           मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे मंदिरे बंद होती. त्यामुळे भक्तांना दर्शन घेता येत नव्हते. आजपासून मंदिरे भाविकांना दर्शनसाठी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर दुर्गाडी मातेच्या मंदिरात देवीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात अली आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते देवीची पूजा करण्यात आली असून यावेळी परिवहन समिती सदस्य सुनील खारूक यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.         या मंदिरात देखील  देवीच्या दर्शनासाठी भक्त सकाळपासून येत आहेत कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जात आहे. तर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.


ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्या वरील दुर्गाडी माता मंदिराची दारे भावीकांसाठी खुले ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्या वरील दुर्गाडी माता मंदिराची दारे भावीकांसाठी खुले Reviewed by News1 Marathi on October 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads