Header AD

कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार


■खारघर येथील पांडवकड्यावरून "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" टीमचे साहस...


  

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार अनुभवला असून  खारघर येथील पांडवकड्यावर "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" टीमचे साहस पाहायला मिळाले.  


पांडवकडा म्हणजे खारघर शहरातील मधोमध असणारा सुमारे ४०० फूट उंचीवरून कोसळणारा मनात धडकी भरावणार कातळकडा. हा कडा नुकताच कल्याणच्या "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" ह्या गिर्यारोहक टीमने सहज आपल्या तंत्रशुद्ध कलेने राप्पेल्लिंगच्या सहाय्याने सर केला. ४०० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या समांतर राप्पेल्लिंग करून ह्या गिर्यारोहकांनी यशाला गवसणी घातली. एक तासाची पायपीट करून कड्याचे टोक गाठता येते आणि त्यानंतर डोळ्या समोर उभा राहतो तो मनात भीतीचे काहूर माजवणारा पांडवकडा. कड्याच्या मधोमध नैसर्गिक गुफा तयार झालेली असून कड्याचा खालील भाग हा नैसर्गिक बदलांमुळे तुटलेला आहे. त्यामुळे पांडवकडा अजूनच धोकादायक रूप धारण करतो. अश्यातच मागील दिवसांच्या पावसामुळे कड्यावरून कोसळणारे पाणी सुद्धा वाढलेले होते. पण आपल्या तंत्रशुद्ध  गुणांनी ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंग करून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी सर केला. मोहीम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर टीमचे पवन घुगे, रणजित भोसलेदर्शन देशमुख, भूषण पवार, अक्षय जामदरेनितेश पाटील आणि भावेश पाटील उपस्थित होते. त्यासोबत सह्याद्री खोऱ्यात गरज भासल्यास मानवी बचावकार्य करण्यासाठी सुद्धा सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर अग्रेसर राहणार असल्याचे सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या वतीने सांगण्यात आले.


कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार Reviewed by News1 Marathi on October 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads