Header AD

भटक्यांचे पदोन्नती मधील आरक्षण सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक


■महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कल्याणात भाजपचे 'आसूड आंदोलन'...


कल्याण  ,  कुणाल  म्हात्रे : भटके विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी कल्याणात भाजपतर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले. कल्याणच्या तहसिल कार्यालयावर भाजपच्या भटके विमुक्त आघाडीतर्फे 'चाबूक मोर्चाकाढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात आमदार गणपत गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेभाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष विष्णू सांगळेनगरसेवक मनोज रायमाजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष परिवहन सदस्य संजय मोरे, नरेंद्र सूर्यवंशी, पांडुरंग भोसले आदींसह विविध भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.



राज्य सरकारने गेल्या महिन्यात भटके विमुक्त जमातीच्या शासकीय कर्मचारी - अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींना आरक्षण देणे असंविधानिक असल्याचे राज्य शासनाने नमूद केल्याचे भाजपतर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रामुळे भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये संतापाची लाट पसरली असून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिली.



 एकीकडे राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतं मागितली आणि त्याच समाजाला वंचित करण्याचे काम सरकारने सुरू केल्याचेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्या भटके विमुक्त जाती जमाती समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी आंदोलकांद्वारे करण्यात आली. या 'चाबूक मोर्चा'मध्ये सहभागी झालेल्या पोतराज अर्थातच कडक लक्ष्मीकडून आसूड ओढत सरकारचा निषेध करण्यात आला. 

भटक्यांचे पदोन्नती मधील आरक्षण सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक भटक्यांचे पदोन्नती मधील आरक्षण सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक Reviewed by News1 Marathi on October 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads