Header AD

अत्याचारा विरोधात बोलण्याची ताकद ठेवा : ऍड. अनुराधा परदेशी
ठाणे , प्रतिनिधी  : आपल्याला आपल्यावर घडणाऱ्या अत्याचाराविरोधात तोंड उघडण्याची मोकळीक नाही किंवा आपल्यात ताकद नाही हे चूक आहे. अत्याचाराला एखादा बळी पडत असेल तर मदतीचा हात द्या आणि स्वतःवर होत असेल तर बोलण्याची ताकद ठेवा. अत्याचार करणारा जितका गुन्हेगार त्यापेक्षा अधिक सहन करणारा गुन्हेगार असतो असा उपदेश ऍड. अनुराधा परदेशी यांनी आपल्या भाषणातून दिला.            आदर्श विकास मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ठाणे आयोजित "नवदुर्गा" - सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे मंगळवारी शेवटचे पुष्प परदेशी यांनी गुंफले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. वकीली क्षेत्राचा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या, आपल्या आयुष्यात रोज येणारे अनुभव हे आपल्याला घडवित असतात.            आपण नवरात्र उत्सव निमित्ताने नवदुर्गांचा सोहळा साजरा करतो. हा सोहळा म्हणजेच आपल्यातल्या शक्तीचा, सृजनतेचा, आपल्यातल्या ज्ञानतत्त्वाचा जागर. स्त्री ही शक्ती आहे आणि ती सृजनतेची शक्ती आहे. आपण देवीची पूजा करतो पण तितका सन्मान स्त्रियांना देतो का स्त्रीचा आदर स्वतःच्या घरापासून करतो का? स्त्रियांशी समानतेने वागतो का? 


 

            तर याचे उत्तर नाही असे आहे. लॉकडाऊन काळात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली. कुटुंबातही अत्याचार वाढू लागले. अनेक महिला या आपल्यावरील होत असलेल्या अत्याचाराबाबत बोलण्याचे धाडसही करत नाही अशी खंत परदेशी यांनी व्यक्त केली. समाजात इतकी निष्ठुरतेची भावना आहे की स्त्रीला उपभोगाची वस्तू मानली जाते.            निर्भया प्रकरणातून सर्व भारतीयांनी शिकले पाहिजे. याआधी देखील अशा क्रूरतेच्या घटना घडल्या आहेत. नोकरीच्या ठिकाणी स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाला तर तिला आता दाद मागता येते. फक्त कायदे करून चालत नाही तर त्याची अंमलबजावणी देखील केली पाहिजे याबद्दल जनजागृती झाली आहे असे त्या म्हणाल्या.              तुम्ही अजून निरागसतेच्या जगात आहात. परंतू आजूबाजूचे जग तितके निरागसच असेल असे नाही ते खूप क्रूर देखील असू शकते. आपल्या एका बाजूला छान वाटणारी गोष्ट ही दुसऱ्या बाजूला रंग बदलू शकते. त्यामुळे डोळे मिटून कोणावर विश्वास ठेवू नका. नशेच्या प्रवृत्तीला दूर सारा. आपल्या मित्र मैत्रिणींवर अत्याचार होत असेल तर त्या विरोधात आवाज उठवा असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.            तुम्ही भविष्यात कोणत्याही क्षेत्रात जा परंतू स्वतःमधील शक्तीचा, ऊर्जेचा, सृजनतेचा चांगला उपयोग समाजासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी करून त्यांचे आयुष्य सुंदर करा असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे, प्राध्यापिका अमृता फाळे, पूजा तिवारी आदी उपस्थित होते.

अत्याचारा विरोधात बोलण्याची ताकद ठेवा : ऍड. अनुराधा परदेशी अत्याचारा विरोधात बोलण्याची ताकद ठेवा : ऍड. अनुराधा परदेशी Reviewed by News1 Marathi on October 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

राज्य ज्युदो संघटनेच्या कार्यकारिणीवर डोंबिबलीकर निखिल सुवर्णा आणि आदर्श शेट्टी

    डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डोंबिवली रहिवासी तथा ठाणे जिल्हा ज्यूदो संघटनेचे सचिव नि...

Post AD

home ads