Header AD

२८ वर्षा पासून फळेगांवात नवरात्रीत घुमतोय टाळ मृदूंगांचा नाद नवरात्र उत्सवात हरीनामाचा जयघोष करणारे कल्याण तालुक्यातील पहिले मंडळ
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नवरात्र उत्सव म्हंटला की सर्वत्र डिजेच्या तालावर थिरकणारी तरूणाईची पाऊलं. दांडियाच्या रासक्रिडेत रममान होऊन तल्लीन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगांवात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्रो उत्सवात गेल्या २८ वर्षापासून घुमतोय फक्त टाळ मृदूंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष.
नुकतीच घटस्थापना झाली असूननऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधुम सर्व भारतभर सुरू रहाणार आहे. डिजेचा कर्कश आवाजावर ताल व ठेका धरून नाचणारी तरूणाईसहलहानांन पासून अबाल वृध्दांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचतांना दिसून येतात. पंरतू कल्याण तालुक्यातील फळेगावात मात्र गेल्या २८ वर्षापासून वेगळेच चित्र पहायला मिळते. येथील जरिमरी मित्र मंडळात नवरात्र उत्सवात मात्र दांडिया ऐवजी टाळ मृदूंगाचा आवाज घुमत असून हरीनामाचा जयघोष येथे सुरू आहे.
येथे रोज भजनकिर्तनहरिपाठप्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा देखील त्याच उत्साहात हरीनामाचा गजर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारप्रवचनकार व व्याख्यानकारांचे कार्यक्रम नऊ दिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. रोज अनेक सामाजिकराजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. कल्याण तालुक्यातील नवरात्र उत्सवात हरीनामाचा जयघोष करणारे जरीमरी मित्र मंडळफळेगांव म्हणून जिल्हात ओळखले जात आहे. 

या मंडळाचे एक विशेष बाब प्रकर्षाने दिसून येते कीयांचे सर्व कार्यकर्ते हे तरूण आहेत. असे असून देखील या ठिकाणी दांडिया ऐवजी धार्मिक कार्यक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नामांवत किर्तनकारांची किर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत आसतात. यंदा देखील फळेगांवातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदूंगाचा नाद घुमणार असून हरिनामाचा जयघोष सुरू आहे. 

            आम्हाला आमच्या तरूण मुलांचा अभिमान आहे.  गेल्या २८ वर्षांपासून आमची मुलं हा कार्यक्रम अविरतपणे राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत रहाणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.

२८ वर्षा पासून फळेगांवात नवरात्रीत घुमतोय टाळ मृदूंगांचा नाद नवरात्र उत्सवात हरीनामाचा जयघोष करणारे कल्याण तालुक्यातील पहिले मंडळ २८ वर्षा पासून फळेगांवात नवरात्रीत घुमतोय टाळ मृदूंगांचा नाद नवरात्र उत्सवात हरीनामाचा जयघोष करणारे कल्याण तालुक्यातील पहिले मंडळ Reviewed by News1 Marathi on October 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads