Header AD

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संतोषी मातानगर अटाळी परिसरात पोहोच रस्ते कामांचा शुभारंभ

                                                                  कल्याण , प्रतिनिधि  :  प्रभाग क्रं ७ आंबिवली गावठाण प्रभागातील   संतोषी मातानगर अटाळी भागात पोच रस्ते भ कामांचा तसेच अटाळी गांव विराट मिडोज समोरील मुख्य(रिंगरुट) रस्त्यावर बसवलेल्या नवीन पथदिव्यांचे शुभारंभ शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला. 


प्र क्रं ७ आंबिवली गावठाण प्रभागातील संतोषीमाता नगर अटाळी परिसरात नागरिकांच्या जाण्या येण्यासाठी पोच रस्त्याची सुविधे बाबत नागरिकांची मागणी होती.शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी २० लक्ष  विकास निधीतून तरतुद करीत संतोषी मातानगर ते अटाळी मेन रोड आतील पायवाट पोहोच रस्ता कॉक्रिटिकरण व लादी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ गुरूवारी केला. याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी नागरी मुलभुत सुविधा सोडविण्यासाठी दिलेला शब्द शिवसेना पाळते. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर असतो असे सांगितले.याप्रसंगी माजी सभागुहनेते अरविंद मोरे यांनी मार्गदर्शन करताना  शिवसेना पक्ष जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पक्ष वर्षेभर सातत्याने पाठपुरावा करून काम करीत असल्याने निवडणुकीत विजयी होत असल्याचे सांगितले. संतोषीमाता नगर अटाळी येथील पोच रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी     माजी नगरसेवक दशरथ तरेमाजी नगरसेविका हर्षाली थविलमाजी नगरसेवक दुर्योधन पाटीलशिवसेना पदाधिकारी   ऋषीकांत पाटीलविशाल पाटीलदिनेश कोनकररमेश पाटीलअरूण पाटीलवासुदेव पाटील, चतुर सोनावणे आदि मान्यवर उपस्थित होते.

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संतोषी मातानगर अटाळी परिसरात पोहोच रस्ते कामांचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संतोषी मातानगर अटाळी परिसरात पोहोच रस्ते कामांचा शुभारंभ   Reviewed by News1 Marathi on October 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads