Header AD

"त्या" गर्भवती महिलेच्या उपचारासाठी मनसेची ५० हजारांची मदत


■शहर संघटक रुपेश भोईर यांच्या तत्परतेमुळे वाचला होता महिलेचा जीव....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली रुग्णालयात शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी एका गर्भवती महिलेसह पल्स रेट तसेच शरीरातील शुगर अतिरिक्त वाढ झाल्याने फिजिशियन डॉक्टर नसल्याचे कारण देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन दारातच ताटकळत ठेवले होते. याबाबत मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी तत्परता दाखवत या महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तिचा जीव वाचवला होता.  तसेच या महिलेला उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देखील केली आहे. वसंत व्हॅली येथे पालिकेने प्रसूतिगृह नव्याने सुरू केले असून बैल बाजार येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईरफाना शेख या महिलेला प्रसूती करिता ८ ऑक्टोबर तारीख दिली होती. आपली आई व भावा यासोबत सकाळी ८ च्या दरम्यान प्रसुती साठी ऍडमिट होण्यासाठी हि महिला आली होती. प्रचंड वेदना सुरू असताना ईरफानाला डॉक्टरांनी उपचारार्थ दाखल करून न घेता विविध कारणे देऊन अन्य रुग्णालयात दाखल करावे असे नातेवाइकांनी सांगितले. ४ तास ती गरोदर महिलेला बाहेर बसून होती.याबाबत कल्याण शहर मनसे संघटक रुपेश भोईर यांना या बाबत माहिती समजली असता डॉक्टरांन सोबत चर्चा करून गर्भवती महिलेची शारीरिक अवस्था बघता कल्याणातील खाजगी हॉस्पिटल मध्ये या गर्भवती महिलेला  उपचारार्थ दाखल केले. या रुग्णालयात गर्भवती महिलेची योग्य उपचार होत प्रसूती व्यवस्थित  पार पडली. यात डॉ. अनिता मैथयू आणि डॉ. रेनुमा यांच्या विशेष सहकार्यामुळे मातेचा जीव वाचू शकल्याने मनसे तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.दरम्यान गर्भवती महिलेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ५० हजार रुपयांचा धनादेश या महिलेकडे मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर, शहर अध्यक्षा शितल विखणकर, स्मिता खरे, चेतना रामचंद्रनसुरेखा महाजनप्रशांत जाधवकासम शेख आदि कार्यकर्त्यांनी दिला.

"त्या" गर्भवती महिलेच्या उपचारासाठी मनसेची ५० हजारांची मदत "त्या" गर्भवती महिलेच्या उपचारासाठी मनसेची ५० हजारांची मदत Reviewed by News1 Marathi on October 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads