Header AD

भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे निधन

 
भिवंडी :दि.06  (प्रतिनिधी )  भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्ष होते तर त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले , भाऊ ,बहीण ,पुतणे असा मोठा परिवार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील पत्रकारितेत सक्रिय असताना दै.पुढारी,
नवाकाळ,पुण्यनगरी या नामांकित दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून ते कार्यरत होते.          मागील दोन वर्षांपासून त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. मात्र अजारपणातही त्यांनी आपली पत्रकारिता जिवंत ठेवत पत्रकारिता सुरूच ठेवली होती. तालुक्यातील गुन्हे,कृषी व राजकीय घडामोडींवर दौलत घरत यांचे विशेष लक्ष असायचे . त्यांच्या निधनाने भिवंडीतील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मंगळवारी टेंभिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
         याप्रसंगी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त करीत तालुक्यातील सामाजिक प्रश्नाबद्दल जाणीव बाळगून लिखाण करणारा हाडाचा पत्रकार हरपला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे .
भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे निधन भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे निधन Reviewed by News1 Marathi on October 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads