Header AD

पुष्पक एक्सप्रेस मध्ये प्रवासी महिलेवर बलात्कारासह टाकला दरोडा


■प्रवाशांना चाकूचा धाक दाखून १६  प्रवाशांची केली लूट इगतपुरी कसारा दरम्यानची घटना दोन दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात, फरार आरोपीचा शोध सुरू....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली आहे. कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवशानी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत दोन जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात. तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले .एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले त्याच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या २० वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला.तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता. कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख असं या आरोपींचे नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे.नशेच्या अमलाखालिं त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथकं कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे. याप्रकरणी मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआरपी मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती मनोज पाटील यानी दिली. 

पुष्पक एक्सप्रेस मध्ये प्रवासी महिलेवर बलात्कारासह टाकला दरोडा पुष्पक एक्सप्रेस मध्ये प्रवासी महिलेवर बलात्कारासह टाकला दरोडा Reviewed by News1 Marathi on October 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads