Header AD

जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली गुजरात मधून अटक


■तर या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची मृताच्या कुटुंबाची शंका पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याची कुटुंबाची मागणी...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या केल्याची घटना कल्याण मधील बारावे येथे घडली असून हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी  गुजरातमधील गोधरा मधून अटक केली आहे. तर या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शंका मृताच्या कुटुंबाने व्यक्त केली असून पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याची मागणी कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार कल्याण मधील बारावे गावात राहणाऱ्या मुकेश रमेश देसाईकर  व  शेरखान मुदसिंग खान  हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गेल्या काही दिवसापूर्वी दोघे शस्त्र ठेवण्याच्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. यावेळेस मुकेशने आपला जामीन त्वरित मिळवत जामिनावर सुटका करून घेतली. मात्र  शेरखानला जामीनवर सुटका करण्यासाठी कोणतीच मदत केली नाही. अखेर शेरखानने स्वतः जामिनावर स्वतःची सुटका करून घेतली. मात्र बाहेर आल्यानंतर त्यांनी मुकेश बरोबर आपली मैत्री  तोडून टाकली तरीही मुकेश त्याला वारंवार बोलून मारहाण करत त्रास देत असे.अखेर या त्रासाला कंटाळून शेरखानने  एक प्लॅन करत  ७ ऑक्टोबर रोजी धारधार हत्याराने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुकेशची हत्या केली.  हत्येनंतर त्याने आपला मोबाईल आपल्या जवळ न बाळगता तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करत तीन वेगवेगळ्या टीम करून शेरखान चा शोध सुरू केला. अखेर गुप्तचरांची माहिती व पोलिसांच्या टेक्निकल बाबींमळे शेरखानला गुजरातमधील गोधरा मधून  गजाआड केले व आपला पुढचा तपास सुरू केला असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली.दरम्यान या हत्येमध्ये आणखी काही लोकांचा हात असून प्लॅनिंग करत ही हत्या केल्याचा आरोप मुकेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी इतर बाबी तपासून या संबंधित असलेल्या गुन्हेगारांना कठोर कारवाई करावी अशी मागणी मुकेशचे कुटुंबीय करीत आहेत.

जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली गुजरात मधून अटक जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली गुजरात मधून अटक Reviewed by News1 Marathi on October 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads