Header AD

कॉम्रेड दिपक अमृतसागर यांच्या निधनाने डाव्या चळवळतील नेतृत्व हरपले

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणातील काँम्रेड दिपक अमूतसागर यांचे शुक्रवारी दुखःद निधन झाल्याने तळागाळातील समाजाच्या  प्रश्नासाठी पाठपुरावा करणारे लढवय्ये नेतृत्व हरपल्याने समाजातील सर्वच स्तरातुन हळहळ व्यक्त होत आहे.  काँम्रेड दिपक यांची आकलन शक्ती उत्तम होती. समोरच्याला आपले म्हणणं पटवून देण्यात ते वाकबर होते. मिलिंद गायकवाड, बाबा रामटेकेदिपक अमृतसागर यांनी ठाणे जिल्ह्यात पाहिली घरेलू कामगार संघटना सुरु केली. तेव्हा त्यांनी वस्त्या वास्त्यात जाऊन घर  कामगार महिलांना तुम्ही या देशातील कामगार आहात हे पटवून देण्यात यशस्वी झाले आणि बघता बघता आठ ते दहा हजार महिला सदस्य झाल्या. मंत्रालयावर मोर्च्या नेण्या इतकी ताकत संघटनेत निर्माण झाली आणि तीन वेळा मंत्रालयावर धडक दिली.कॉ. दिपक याच्या कडे भाषण करण्याची एक शैली होती तीचा वापर ते  सभेत योग्यपणे करत असे आणि सभा जिंकण्याचे काम तो उत्तम करीत असे. त्याची ही एक नैसर्गिक शैली होती. स्वतःचे आयुष्य समाजासाठी झोकून देऊन त्या मोबदल्यात समाजाकडून काडीमात्र अपेक्षा न ठेवणारा दिपक सारखा कार्यकर्ता विरळच अशी प्रतिक्रिया मिलिंद गायकवाड यांनी व्यक्त केली. काँ. दिपक यांच्या जलदान विधीचा कार्यक्रमशोक सभा रविवारी सकाळी ११ वाजता सावित्रीमाई फुले सभागृह, जुनी पोलिस वसाहत, बिर्ला कॉलेज जवळ,कल्याण पश्चिम येथे आयोजित केली आहे.

कॉम्रेड दिपक अमृतसागर यांच्या निधनाने डाव्या चळवळतील नेतृत्व हरपले कॉम्रेड दिपक अमृतसागर यांच्या निधनाने डाव्या चळवळतील नेतृत्व हरपले Reviewed by News1 Marathi on October 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads