Header AD

अलका सावली प्रतिष्ठानतर्फे श्रम कार्ड वितरण उपक्रमाला सुरवात
कल्याण, कुणाल  म्हात्रे   : असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी सुरू केलेल्या श्रम कार्ड वितरणाला कल्याणमध्ये अलका सावली प्रतिष्ठान तर्फे सुरवात करण्यात आली आहे. रिक्षाचालक कार ड्रायव्हर व इतर गरजू लोकांना या श्रम कार्ड वाटपाचा शुभारंभ आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर वायले, आकाश वायलेजयेश वायलेसागर वाघराहुल पाटीलतुषार देशमुखबंड्या कराळेविशाल सोनवणेनिलेश पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या योजनेचा मुख्य उद्देश देशातील कामगार आणि मजुरांसाठी आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच भारतभरातील अपरिचित क्षेत्रातील कामगार आणि कामगारांविषयी संपूर्ण माहिती गोळा केली आहे. हे यूएएन कार्ड आयुष्यभर वापरता येते. देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.अलका सावली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे मार्फत वर्षभर असे विविध उपक्रम राबविले जातात. त्यात आरोग्य शिबिरआदिवासी पाड्यावरील लोकांना कपडे गरजूंना अन्नधान्यवाटप व करोना काळातही ज्या वस्तूंची गरज ती म्हणजे मास्क, सॅनीटायझरविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना सायकलीलहान मुलांसाठी खेळणी  वाटपविविध स्पर्धा महिलांसाठी असे अनेक उपक्रम ही संस्था नेहमी राबवत असते. विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम त्यात चित्रकलानिबंधरांगोळीवक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. सात वर्षापासून संस्था अखंड कार्यरत असून या संस्थेने राबवलेल्या उपक्रमांचे नागरिकांकडून नेहमी कौतुक होत असते.

अलका सावली प्रतिष्ठानतर्फे श्रम कार्ड वितरण उपक्रमाला सुरवात अलका सावली प्रतिष्ठानतर्फे श्रम कार्ड वितरण उपक्रमाला सुरवात Reviewed by News1 Marathi on October 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads