Header AD

पहिल्‍याच रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल इंडिया फायनलच्‍या टॉप १६ फायनालिस्‍ट्सची घोषणा, १६ ऑक्‍टोबर रोजी फायनलचे आयोजन
मुंबई - ४ ऑक्टोबर २०२१ : -  देशभरातील १५०० हून अधिक डान्‍सर्सनी डिजिटल क्‍वॉलिफायर्समध्‍ये सहभाग घेतला; हिप-हॉप डान्‍सर डायब्‍लो, पॉपर काइट आणि डान्‍सर व कोरिओग्राफर अॅण्‍टोनेट गोमिस यांचा समावेश असलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय परीक्षकांच्‍या पॅनलकडून नऊ शहरांमधील १६ डान्‍सर्सची फायनालिस्‍ट्स म्‍हणून निवड          ते आता १६ ऑक्‍टोबर रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल इंडिया फायनलमध्‍ये स्‍पर्धा करतील, जेथे ऑनलाइन प्रेक्षक मत देतील आणि देशाच्‍या पहिल्‍या राष्‍ट्रीय चॅम्पियनला मुकुट घालतील         रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल ही अद्वितीय स्‍वरूप असलेली जागतिक स्ट्रीट डान्‍स इव्‍हेण्‍ट सिरीज यंदा पहिल्‍यांदाच भारतामध्‍ये आयोजित करण्‍यात आली. जगभरातील ३० देशांमध्‍ये ९० हून अधिक इव्‍हेण्‍ट्सच्‍या आयोजनासह रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल खरा जागतिक इव्‍हेण्‍ट आहे.           यामधील अद्वितीय ट्विस्‍ट म्‍हणजे प्रेक्षकच परीक्षक असतात. विविध स्ट्रीट डान्‍स स्‍टाइल्‍समधील डान्‍सर्स जगभरात हिट ठरलेल्‍या गाण्‍यांवर, तसेच क्‍लासिक बीट्सवर अद्वितीय परफॉर्मन्‍स सादर करत एकमेकांसोबत स्‍पर्धा करतात आणि उपस्थित प्रेक्षकवर्ग अद्वितीय वोटिंग यंत्रणेच्‍या माध्‍यमातून विजेता ठरवतात.          देशाच्‍या नऊ शहरांमधील टॉप १६ आता १६ ऑक्‍टोबर रोजी रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल इंडिया फायनलमध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करतील. यामधून पहिल्‍या राष्‍ट्रीय चॅम्पियनला मुकुट घालण्‍यात येईल आणि त्‍याला ४ डिसेंबर रोजी जोहान्‍सबर्ग येथे वर्ल्‍ड फायनलमध्‍ये देशाचे प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी मिळेल.फायनल पाहण्‍यासाठी आणि देशाचा पहिला रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल इंडिया चॅम्पियनला मत देण्‍यासाठी कृपया www.redbull.in/danceyourstyle येथे भेट द्या.

पहिल्‍याच रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल इंडिया फायनलच्‍या टॉप १६ फायनालिस्‍ट्सची घोषणा, १६ ऑक्‍टोबर रोजी फायनलचे आयोजन पहिल्‍याच रेड बुल डान्‍स युअर स्‍टाइल इंडिया फायनलच्‍या टॉप १६ फायनालिस्‍ट्सची घोषणा, १६ ऑक्‍टोबर रोजी फायनलचे आयोजन Reviewed by News1 Marathi on October 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads