Header AD

आरक्षित भूखंडावर खेळाची मैदाने साकारण्याचा मानस – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील ग्रामीण "अ" प्रभागक्षेत्रातील आंबिवली येथे आरक्षित भुखंडावर  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वुक्षारोपण करीत वुक्ष लागवड करण्यात आली.  याप्रसंगी आरक्षित भुखंडावर सद्य स्थितीत खेळाची मैदाने कशी साकारता येतील याबाबत मानस असल्याचे प्रतिपादन आयुक्तांनी केले.     


   

               महात्मा गांधी जयंतीलाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधत आंबिवली येथील स्वराज्य नेपच्यून गुहप्रकल्प परिसरात मनपाच्या आरक्षित भुखंडावर शनिवारी सकाळी वुक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण समयी मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधवसहा. आयुक्त अ प्रभाग राजेश सावंत,  उयान अधिक्षक अनिल तामोरे तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी उपस्थित होते.याप्रसंगी आयुक्त यांनी या आरक्षित भुखंडावर कबड्डीचे मैदान करण्यात यावे. तसेच  हा  ग्रामीण भाग तीन दशकापुर्वी कबड्डीपटु खेळाडूचा परिसर म्हणुन जो नावलौकिक होता. ते गतवैभव पुनःश्च प्राप्त व्हावे या दुष्टीकोनातुन "अ" प्रभागात आरक्षित भुखंडाच्या जागेत कबड्डीखो ,खोव्हाँली बाँल या खेळासाठी मैदाने करण्याबाबत प्रशासन पुढाकार घेणार  आहे. आंबिवली स्वराज्य गुहप्रकाल्प परिसर या आरक्षित भुखंडावर दसर्या पर्यंत कबड्डीचे क्रीडांगण साकारण्याचे आदेश दिले. तसेच कबड्डी साठी प्रशिक्षकांची गरज भासल्यास त्याबाबत प्रशासन मदत करेल असे प्रतिपादन केले. तसेच याठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे देखील आयुक्तांनी सुचवले.    यामुळे एकेकाळी या ग्रामीण पट्यातील नामंकित कबड्डी संघ ए व्ही कबड्डी संघ, नवरत्न  कबड्डी संघदिपक कबडी संघएनआरसी बाईज्गर्ल्स कबड्डी संघबजरंग कबड्डी संघ, क्रांतीसंघ, नारायण कबड्डी संघ अशा संघातुन अनेक नामवंत कबड्डी पट्टू घडले त्यांनी कबड्डीची मैदाने आपल्या कबड्डी खेळाच्या प्रर्दशानात गाजवली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आरक्षित भुखंडावर कबड्डी ची मैदाने साकारण्याच्या संकल्पनेमुळे "अ " प्रभागातील ग्रामीण पट्यातील गावातील कबड्डीखेळातील गत वैभव प्राप्त होणार असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.       


  

"अटाळी येथील स्थानिक रहिवाशी माजी महाराष्ट्र राज्य संघातील कबड्डी पट्टू प्रकाश  पाटीलयांनी  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कबड्डी खेळाडू साठी कबड्डी ची हक्काची मैदाने साकरण्याच्य निर्यणाचे कौतुक करीत याबाबत आम्ही देखील नवीन कबड्डी पट्टू कसे तयार होतील याबाबत मदत करु असे सांगितले."   


      

"प्रशासनाच्या खेळाच्या मैदानाबाबत असलेला सकारात्मक निर्याणाचे आम्ही स्वागत करतो. तसेच कबड्डीची मैदाने  साकरल्याने निश्चितच ग्रामीण पट्यात कबड्डी पट्टू तयार होतील. ग्रामीण पट्यातील कबड्डीचे गत वैभव प्राप्त होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक कबड्डी पट्टू सुभाष पाटील यांनी दिली."                                                           


"आजची मुले मैदानी खेळापासुन दूर जात मोबाईल गेमच्या खेळात रस दाखवित आहेत. आयुक्तांनी आरक्षित भुखंडावर खेळाची मैदाने साकरण्याबाबत मानस जाहीर केल्याने मैदानी खेळांसाठी मैदाने उपलब्ध झाल्यास याकडे तरूणाई आकर्षित होऊन कसरती मुळे आरोग्य उत्तम राहत व्यवसनाधितापासुन अल्पित राहण्यासाठी मदत होईल असे मोहने येथील रहिवासी प्रविणा कांबळे यांनी सांगितले."

आरक्षित भूखंडावर खेळाची मैदाने साकारण्याचा मानस – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आरक्षित भूखंडावर खेळाची मैदाने साकारण्याचा मानस – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  Reviewed by News1 Marathi on October 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण बस सेवा सुरु झाली असून आज सकाळी ५ वाजता प...

Post AD

home ads