Header AD

डोंबिवलीतील शाळेत विद्यार्थ्यांना पेढे देऊन भाजप कडून स्वागत सॅसॅनेटराईझ करून मास्कचे वाटप विद्यार्थीं व पालक वर्ग आनंदी ....

डोंबिवली ( शंकर जाधव ) दीड वर्षांनी शाळेची घंटा वाजल्याने आनंदाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा शाळेजवळील सरस्वती शिक्षण मंडळाचे श्रीमती सावित्रीबाई बसप्पा हेब्बळ्ळी विद्यालयात  प्रवेश केला.सामाजिक अंतर ठेवत शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे  शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत करण्यात आले.

          शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना सॅनेटराईझ करून मास्क देत होते.यावेळी भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस,उपाध्यक्ष अमोल दामलेसुरेश जोशी यांनी पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.दामले यांनी वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. तर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकण्याचा आनंद होत असल्याचे सांगितले.तर पालकवर्गानी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले.

   
         तब्बल दीड वर्षांनी शाळा `अॅनलॉक`झाल्याचा आनंद शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसला.विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेले पालकवर्गहि आनंदी तर होते. त्याचबरोबर शाळेत आपल्या पाल्यांचा आरोग्याची काळजी घेतली जाईल असा विश्वासहि दिसत होता.ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला असून प्रत्यक्ष शाळेत जाऊन आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत शिकायला मिळणार यामुळे विद्यार्थ्यांनी  हसत –हसत शाळेत प्रवेश करत होते.

       डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा शाळेजवळील सरस्वती शिक्षण मंडळाचे श्रीमती सावित्रीबाई बसप्पा हेब्बळ्ळी विद्यालयात शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. शाळेत प्रवेश करताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले होते. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवत विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क लावून शाळेत प्रवेश करताना सुरुवातीला थर्मल टेस्ट करून सॅनेटराईझ करत मास्क दिले.

     यावेळी भाजपचे डोंबिवली पश्चिम मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यासह दामले आणि जोशी यांनी विद्यार्थ्यांना पेढे दिले.तर वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देताना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली.तर शाळेचे शिक्षक संतोष काळे यांनी करोना नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांना शिकवले जाईल असे सांगितले. तर सेजल राऊत यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.

डोंबिवलीतील शाळेत विद्यार्थ्यांना पेढे देऊन भाजप कडून स्वागत सॅसॅनेटराईझ करून मास्कचे वाटप विद्यार्थीं व पालक वर्ग आनंदी .... डोंबिवलीतील शाळेत विद्यार्थ्यांना  पेढे देऊन भाजप कडून स्वागत सॅसॅनेटराईझ करून मास्कचे वाटप विद्यार्थीं व पालक वर्ग आनंदी .... Reviewed by News1 Marathi on October 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads