Header AD

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध विजयी

 
भिवंडी दि 14 (प्रतिनिधी  )  भिवंडी पंचायत सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .         42 सदस्य असलेल्या भिवंडी पंचायत समितीत शिवसेना 20 ,भाजपा 19, काँग्रेस 2 ,मनसे 1असे पक्षीय बलाबल असून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या समझोत्या नुसार मागील दीड वर्षां पासून सभापती व उपसभापती पदावर आलटून पालटून दोन दोन महिन्यां करीता शिवसेना भाजपा लोकप्रतिनिधींना संधी दिली जात असून सभापती पदी असलेले शिवसेनेचे रविकांत पाटील यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या निवडी करीता विशेष सभेचे आयोजन तहसीलदार तथा पिठासन अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
        या सभेत सभापती पदासाठी भाजपाच्या सदस्य निमिता गुरव यांचा   एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .या निवडी नंतर सर्व पंचायत समिती सदस्यांसह अनेक हितचिंतकांनी तसेच भाजपा  भिवंडी ग्रामीण विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागळे यांनी   त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध विजयी भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध विजयी Reviewed by News1 Marathi on October 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads