Header AD

बिर्ला महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटची म्हसकल गावातील विद्यार्थ्यांना मदत विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
कल्याण , प्रतिनिधी  : कोरोना जरी कमी होत असला तरी देशाची,समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शाळा- कॉलेजे जरी सूरु झाले असले तरी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमतरता व गरज भासत आहे. त्या अनुषंगाने बी.के बिर्ला महाविद्यालयाच्या सौंजन्याने व बी.के बिर्ला कॉलेज एनएसएस युनिट तर्फे टिटवाळा येथील म्हसकल या गावात तसेचे त्या लगत असलेल्या अंकुर या अनाथ आश्रमात मोफत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.एक वेगळी ऊर्जा व एक वेगळा संदेश बी.के. बिर्ला कॉलेज एनएसएस युनिट तर्फे गावातील मुलांना देण्यात आला. एनएसएस युनिटच्या स्वयंमसेवकांनी समाज जागृती केलीगावातील मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. एक प्रकारे जनजागृती घडवून आणत एक आगळा वेगळा उपक्रम महाविद्यालयाच्या एनएसएस युनिट तर्फे राबवण्यात आला. एक नवं चैतन्याच वातावरण गावातील मुलांना मध्ये निर्माण करण्याच काम येथे करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये बी.के. बिर्ला कॉलेजचे शैक्षणिक संचालक नरेश चंद्र, महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश पाटीलवाणिज्य शाखेचे उप-प्राध्यापक डॉ. बिपीनचंद्र वाडेकरत्याच प्रमाणे महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संदेश जायभायेडॉ सोनाली पाटील, कृष्णा घोडे व बिर्ला महाविद्यालय एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकांनी मोलाची कामगिरी बजावली.

बिर्ला महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटची म्हसकल गावातील विद्यार्थ्यांना मदत विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप बिर्ला महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटची म्हसकल गावातील विद्यार्थ्यांना  मदत विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप Reviewed by News1 Marathi on October 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गोवा येथील स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंचे यश

  कल्याण , कुणाल म्हात्रे  :   गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कल्याणच्या  खेळाडूंनी  अथलेटिक्स ,  फुटबॉल आणि क्रिकेट ...

Post AD

home ads