Header AD

खळबळजनक ! घटस्फोट देत नसल्याच्या वादातून बायकोच्या प्रियकराचा नवऱ्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला, ,,भिवंडी दि 8 (प्रतिनिधी ) बायकोला घटस्फोट देत नसल्याच्या वादातून बायकोच्या प्रियकराने भावाच्या मदतीने भर रस्त्यात अडवून  नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडी - ठाणे मार्गावरील राहनळ गावाच्या हद्दीत घडली आहे.  याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोघा  हल्लेखोर भावाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु  केला आहे. जगनाथ भगत , अभिमन्यू भगत असे हल्लेखोर भावाचे नावे आहेत. जितेंद्र पाटील (वय, ३८) असे हल्ल्यात गंभीर जखमी नवऱ्याचे नाव आहे. 

 


लाकडी दांडक्यासह कैचीने वार .. 


जखमी नवरा आणि गुन्हा झालेले दोघेही भाऊ भिवंडी तालुक्यातील डुंगे गावात राहतात. त्यातच गेल्या दोन वर्षापासून नवरा बायको मध्ये  सोडचिठ्ठ् देण्यावरून वाद सुरु होते. अश्यातच काल दुपारच्या सुमारास भिवंडी - ठाणे मार्गावरील राहनळ गावाच्या हद्दीतील भर रस्त्यावर जितेंद्रला गाठून ‘तू तुझ्या बायकोला घटस्फोट का देत नाही’, असे बोलून वाद घातला.             या वादानंतर आरोपी भावांनी अचानक लाकडी दांडक्याने प्रहार करून जितेंद्रला झाली पाडले. जितेंद्र रस्त्यावर पडताच कैचीने वार केले. यामध्ये जितेंद्र गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर नारपोली पोलीस ठाण्यात दोघा भावाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षिक विकास राऊत करीत आहेत. 


खळबळजनक ! घटस्फोट देत नसल्याच्या वादातून बायकोच्या प्रियकराचा नवऱ्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला, ,, खळबळजनक ! घटस्फोट देत नसल्याच्या वादातून बायकोच्या प्रियकराचा नवऱ्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला, ,, Reviewed by News1 Marathi on October 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads