Header AD

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कचऱ्याचे साम्राज्य

                                                      कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मार्केट परिसरात कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रोगराईला निमंत्रण मिळणार असे दिसत आहे.  

                                              

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फुलमार्केटभाजी मार्केटकांदाबटाटा मार्केटफळ मार्केटधान्य मार्केट असा परिसर असुन या परिसरात मालाच्या गाड्यांचा मोठा राबता असतो. नवरात्री उत्सवामुळे फुल मार्केट मध्ये फुलांची मोठी आवक झाली. परंतु दररोज नित्यनेमाने संध्याकाळी येणारा पाऊसआणि ग्राहकवर्गाने फिरवलेली पाठ पाहता फुलाची आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील खरेदीला ग्राहकवर्गाचा निरउत्साह पाहता फुल मार्केट मधील व्यापर्यानां विक्री न झाल्यमुळे न खपलेली फुले फेकुन देण्याची वेळ आली. या कुजलेल्या आणि सडलेल्या फुलांचे कृषी उत्पन्न बाजार समिती रस्त्यालगत ढिगाऱ्याच्या ढिगारे दिसत असून धाक्कादायक बाब म्हणजे या कचऱ्याच्या फुलांच्या ढिगामधुन फुले वेचुन काही जण विक्रीसाठी नेतात हे दुदैवी असुन फुलांच्या कचार्याचे ढिग लागेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन करते काय असा सवाल उभा रहिला आहे.फुल मार्केटचे मनपाकृषी उत्पन्न बाजार समिती यामधील भिजंत घोगंडेफुल मार्केटची दुरावस्था फुल मार्केट मधील घाणीचे चिखलाचे साम्राज्य पाहता सर्वसामान्य ग्राहकवर्ग कसा या मार्केट मध्ये पाऊल टाकणार अशी शोकांतिका झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारातील भाज्यांच्या कचरा इतस्ततः पसरलेला त्यातुन फळभाज्या वेचणारे पाहता आरोग्याच्या  प्रश्नाबाबत जागरूक असणाऱ्या भाजी घेणार्या ग्राहकांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार असे दुष्य दिसत आहे. धान्य बाजारात देखील कचारा व गाड्यांची बेशिस्त पणे केलेली पार्किंग पाहतामोकाट जनावरांचा वावर पाहता "स्वच्छ भारत मिशनचे"तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.       कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होणारी पाहटेच्या समयास घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहता कोरोना नियमवल्लीला हरताळ फसल्याचे चित्र दिसते. कृषी उत्पन्न बाजार समिती कचरा, घाणीचे साम्राज्य कधी संपवणार आवार कसा स्वच्छ करणार असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सभापती कचार्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार याकडे खरेदीसाठी येणारा ग्राहकवर्ग यानिमित्ताने मोठ्या आशाने अपेक्षा करीत आहेत.       


                                                                                             "कृषी  उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल थळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही."        "कल्याण डोंबिवली मनपा  उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले मनपाच्या फुल मार्केट मधील कचरा संकलनासाठी दररोज ट्रक्टरची व्यवस्था केली असुन कृषी उत्पन्न बाजार समिती ने त्यांच्या आवारातील कचार्याची विल्हेवाट करावी याबाबत दोन नोटिसा दिल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती ने कचार्याबाबत गंभीरपणे दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगणार असल्याचे सांगितले."             "कृषी  उत्पन्न बाजार समितीचे सह्याक सचिव दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता फुल मार्केट मधील कचरा मनपा नेत नसल्याने फुलांचा कचारा दिसत आहे." आम्ही आमचा  कचारा उचलतो असे सांगितले.''

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कचऱ्याचे साम्राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कचऱ्याचे साम्राज्य Reviewed by News1 Marathi on October 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads