Header AD

ठाण्यात सुप्रियाताई सुळेंनी 108 महिलांसह केली तुळजा भवानीची महाआरती
ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी या महाआरतीचे नियोजन केले होते.         शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीमध्ये सुमारे 108 महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी सुप्रियाताई म्हणाल्या की, वर्षातून एकदाच माझ्या आजी शारदाबाई पवार या  नवरात्रौत्सवात उपवास करायच्या; शारदाबाई पवार यांच्यापासून सुरु आहे.        ही परंपरा माझ्या आाईने कायम ठेवली होती. त्यामुळे नवरात्रौत्सव ही माझ्यासाठी आई आहे. या निमित्ताने मी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानते की त्यांनी नवरात्रौत्सवातच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. तरीही, सरकारने जे नियम घालून दिले आहेत. त्यांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.        या महाआरतीला संघर्षच्या महिलाध्यक्षा तथा समाजसेविका ॠता आव्हाड, राष्ट्रवादीचे गटनेते तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश चिटणीस सुहास देसाई  यांच्यासह  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहाराध्यक्षा सुजाता घाग, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी, कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, नगरसेविका अपर्णा मिलींद साळवी,  आरती वामन गायकवाड, वर्षा अरविंद मोरे, अनिता  किणे, सुनिता सातपुते, नादीरा सुरमे, सुलोचना पाटील, हाफिजा नाईक, रुपाली गोटे,फरजाना शाकीर शेख, आशरीन इब्राहिम राउत,साजीया परवीनसर्फराज अन्सारी, वहिदा खान, राधाबाई जाधवर,  वनिता घोगरे,  अंकिता शिंदे यांच्यासह शेकडो महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

ठाण्यात सुप्रियाताई सुळेंनी 108 महिलांसह केली तुळजा भवानीची महाआरती ठाण्यात सुप्रियाताई सुळेंनी 108 महिलांसह केली तुळजा भवानीची महाआरती Reviewed by News1 Marathi on October 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण बस सेवा सुरु झाली असून आज सकाळी ५ वाजता प...

Post AD

home ads