Header AD

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न
ठाणे, प्रतिनिधी  :  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभागातील महिलांसाठी स्वसंरक्षण ( Self Defence ) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सद्यस्थितीतील उद्भविणाऱ्या बलात्कार, लैंगिक अत्याचार यासारख्या विकृतींना महिलेने समर्थपणे तोंड द्यावे याकरिता एक प्राथमिक गरज वरील प्रमाणे संकल्पना राबविण्यात आले आहे.         सदर कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्राताई वाघ, माधवीताई नाईक, मा.आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, मा.संघटन सचिव विलास साठे, महिला बालकल्याण सभापती ठा.म.पा. राधिकाताई जाधववार, मा.उपायुक्त वर्षाताई दीक्षित, तसेच नगरसेवक महोदय सर्वश्री संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, दीपा गावंड, नंदा पाटील, कविता पाटील, कमल वाघ, उपाध्यक्ष सुजय पत्की, डॉ.राजेश मढवी, सचिन आळशी,मानसी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचे नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांनी शतशः आभार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on September 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads