Header AD

विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती तलवाबाहेर काढून कचर्‍यामध्ये फेकण्यात आल्याचा प्रकार ठामपाचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला
ठाणे (प्रतिनिधी ) - विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती तलवाबाहेर काढून कचर्‍यामध्ये फेकण्यात आल्याचा प्रकार ठामपाचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला. तसेच, त्यांनी या गणेशमूर्तींचे पावित्र्य भंग होऊन गणरायाची विटबंना होऊ नये, यासाठी सदर मूर्तींचे पुन्हा खाडीमध्ये विसर्जन केले.         मागील आठवड्यामध्ये दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याात आले होते. उपवन येथील तलावामध्येही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यासाठी कृत्रिम तलाव ठाणे पालिकेने तयार केले होते. या तलावांमध्ये विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती कोणाच्याही भावना दुखावू नयेत, यासाठी त्या खाडीमध्ये विसर्जित करण्यात याव्यात, यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती.           मात्र, उपवन येथील या ठेकेदाराने सदरच्या मूर्ती चक्क कचर्‍यामध्ये फेकून दिल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर शानू पठाण यांनी दिनेश बने ,अभिषेक पुसाळलकर, अक्षय जामदार,वैभव विचारे,  विनीत तिवारी या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह घटनास्थळ गाठून संबधित ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. तसेच, या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी त्या खाडीवर पाठविल्या.          महाराष्ट्राचे आराध्य दैवताची अशी विटंबना आम्ही सहन करणार नाही; सदर ठेकेदाराने आमच्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शानू पठाण यांनी केली.

विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती तलवाबाहेर काढून कचर्‍यामध्ये फेकण्यात आल्याचा प्रकार ठामपाचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती तलवाबाहेर काढून कचर्‍यामध्ये फेकण्यात आल्याचा प्रकार ठामपाचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन - प्रा.देविदास मुळे

■सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.... कल्याण, कुणाल म्हात्रे  :  मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन...

Post AD

home ads