Header AD

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ माजी सैनिकांचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू अज्ञात रिक्षा चालक फरार; पोलिस तपासा बाबत संताप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मॉर्निंग वॉकला गेलेले जेष्ठ नागरिक तसेच माजी सैनिक असणाऱ्यांना रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या रिक्षाचालकाने जोरदार ठोकर मारल्याने या दुर्घटनेत रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ते मयत झाले असून आठवडा उलटूनही अपघात करणारा रिक्षा चालक खडकपाडा पोलिसांना भेटत नसल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.३१ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे माजी सैनिक असलेले राजाराम कृष्णा व्हणकट्टे (७८) सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉक करण्यासाठी निघाले. मोहने वडवली नवीन ब्रिज जवळ वेगात येत असलेल्या प्रवासी रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांना डोक्यालाछातीलाकंबरेला जबर मार लागला. या अपघातात रिक्षा पलटी होऊन प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे कारण देत या अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना रुग्णालयात नेण्याचे कारण देत तो पसार झाला आहे.  याबाबत सकाळी वॉक करणाऱ्या येथील युवकाने जबर जखमी अवस्थेत पडलेल्या व्हणकट्टे यांना एका रिक्षा मध्ये बसवित त्यांच्या घरी आणून सोडले.मात्र डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने अपघाता संदर्भात काहीच सांगितले नसल्याने त्यांच्या मुलाने चहा देऊन त्यांना आराम करण्याचे सांगितले असतानाच त्यांना उलटी झाली. याबाबत त्यांना कल्याणमधील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आय सी यु मध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.मोहोनेअंबिवली स्टेशन परिसरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे परमिटयुनिफॉर्मबॅचलायसन्स व अत्यावश्यक वाहतुकीची कागदपत्रे नसतानाही रिक्षा व्यवसायकवाहतूक विभाग व आर.टी.ओ.ला फाट्यावर मारत अल्पवयीन मुले ही रिक्षा चालवीत असल्याचे दिसून येत आहे.सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणारा पादचारी रस्त्यांवर पहाटेच्या सुमारास सुरक्षित चालू शकत नसल्याने वाहतूक पोलिसांनबद्दल येथे संताप व्यक्त केला जात आहे. माजी सैनिक असणारे ज्येष्ठ नागरिकाला रस्त्यांवर विव्हळत पाडून पसार झालेला अज्ञात रिक्षाचालक एक आठवडा उलटूनही मिळत नसल्याने याबाबत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तपासी अंमलदार ज्ञानेश्वर सुरवाडे यांना विचारणा केली असता अज्ञात रिक्षाचालकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ माजी सैनिकांचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू अज्ञात रिक्षा चालक फरार; पोलिस तपासा बाबत संताप मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ माजी सैनिकांचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू अज्ञात रिक्षा चालक फरार; पोलिस तपासा बाबत संताप Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads