Header AD

शिवसेनेच्या शाखे सारखे अथक काम सुरु ठेवा ..मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला


 


डोंबिवली ( शंकर जाधव ) अवघ्या महाराशात्रालाचा नव्हे तर देशभरात शिवसेनेच्या शाखेचे कौतुक झाले आहे.२४/ ७ सुरु असणारी शिवसेनेची शाखा हे जनतेसाठी न्याय मागणारे एक दरबारच आहे. शाखेत सतत शिवसैनिक बसत असल्याने जनतेला आपली कामे याच शाखेच्या माध्यमातून होतील अशी अशा असते.त्यामुळे शिवसेनेच्या शाखेचे राजकीय नेतेमंडळींकडून नेहमीच वाहवाह करण्यात आली.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या शाखेसारखे अथक काम सुरु ठेवा असा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डोंबिवलीतील एका कार्यक्रमात दिला.


     

       महाविकास आघाडीत गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस ठाणे येथील रोहित सामंत यांच्या  पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदेठाणे जिल्हा समन्वयक आनंद परांजपेमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रवक्ता महेश तपासे, गुलाब वझेडोंबिवली अध्यक्ष सुरेश जोशी, सुशील सामंत, सारिका गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहून भलतेच खुश झाले होते इतके की त्यांना करोनाच्या तिसरया लाटेचा देखील काही काळ विसर पडला होता. आपण गर्दी आवडणारा माणूस असल्याने पक्षाला पुन्हा एकदा उर्जितावस्था येत असल्याने आपण पुन्हा पुन्हा येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.


 

      आव्हाड यांनी आपल्या भाषणातर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची तोंडभरून स्तुती केली. मात्र दुसरीकडे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी आणि रस्ते यासारख्या समस्या सुटत नसल्याचे सांगितले. शिवसेनेच्या शाखेबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, शिवसेनेच्या शाखेत शिवसैनिक २४ तास जनतेच्या कामासाठी बसलेले असतात. शिवसैनिक हॉस्पीटलसाठी बेड मिळून देतात, नवरा-बायकोमधील भांडण मिटवता, घरातील वाद मिटवतात, हॉस्पिटल साठी धावतात. आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात अश्याच प्रकारची कामे झाली पाहिजेत.         तर राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर न्या, ते पुन्हा पक्षात येईल असे सांगितले. तर तिसऱ्या लाटेचा विषाणू अधिक घातक असून इस्त्रायलला देखील वेठीस धरल्याचे सांगत कार्यकर्त्यांना तिसरी लाट गांभीर्याने घ्या असे आवाहन केले.

शिवसेनेच्या शाखे सारखे अथक काम सुरु ठेवा ..मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला शिवसेनेच्या शाखे सारखे अथक काम सुरु ठेवा ..मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads