Header AD

सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसीच्या उपायुक्ता सह प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याने लाखो रुपये उकळले ?


■बांधकाम व्यावसायिका कडून अधिकाऱयांनी पैसे घेतल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   कल्याण डोंबिवली महानगर पालिका ही भ्रष्टाचाराची बजबजपुरी आहे हे पुन्हा सिद्ध झाले असून पालिकेच्या डीपी रस्त्यात बाधा येणारया सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळूनही या बेकायदेशीर इमारतीवर पालिकेने नुकतीच काही दिवसांपूर्वी कारवाई करीत इमारत जमीनदोस्त केली होती.        या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने इमारतीवर कारवाई न करण्यासाठी पालिकेच्या संबधित विभागाचे उपायुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करीत भांडाफोड केला व अधिकारी पैसे घेत असल्याच्या व्हिडिओ ची सीसीटीव्ही फुटेज उघड केल्याने पालिकेच्या  संबधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून या गंभीर प्रकरणाची पालिका आयुक्तांनी दखल घेत या प्रकरणाची चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे सांगितल्याने  बेकायदा बांधकामासाठी बदनाम असलेली केडीएमसी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 


 

           डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने चार दिवसापूर्वी कारवाई केली. सदरच्या बेकायदेशीर सहा मजली इमारती वर कारवाई टाळण्यासाठी या इमारतीचा बिल्डर मुना सिंग याने केडीएमसी प्रशासनाचे पालिकेचे उपायुक्त अनंत कदम  व प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांची एका हॉटेल मध्ये बैठक घेतली होती.            यावेळी कारवाई न करण्यासाठी चर्चा करीत लाखों रुपये दिले होते. लाखों रुपये घेऊन  सुद्धा पालिकेने या इमारतीवर कारवाई करीत जमीनदोस्त केल्याने बिल्डर मुन्ना सिंग याने उपायुक्त अनंत कदम व प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप करीत  या पूर्वी ही अनेक वेळा या अधिकाऱ्यानं वारंवार पैसे दिले असून दोघानी आयुक्तांच्या नावावर सुद्धा पैसे  घेतले असल्याचे बिल्डर मुन्ना सिंग यांनी संगितले. विकासकाने ज्या हॉटेल मध्ये पैशाची देवाण घेवाण झाली त्यावेळेचे व  त्या ठिकाणंचा सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आल्याने या प्रकरणाचा चांगलाचा भांडा फोड केला आहे. या प्रकरणाने पालिकेत एकाच खळबळ उडाली असून, अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामाची पाळेमुळे किती पालिकेत खोलवर रुतलेली  दिसून आले आहे. या भ्रष्टाचारात पालिकेच्या अधिकार्या सोबत शासनेने प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याचे हाथ बरबटलेले असल्याने कुपणच शेत खात असल्याने दोष द्यायचा कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची पालिका आयुक्त डॉ.विजय कुमार सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे माहिती  दिली आहे. असे असले तरी आयुक्त काय कारवाई करतात  हे पाहावे लागेल.

सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसीच्या उपायुक्ता सह प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याने लाखो रुपये उकळले ? सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसीच्या उपायुक्ता सह प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याने लाखो रुपये उकळले ? Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads