Header AD

ओरिफ्लेम द्वारे नव्या ब्युटेनिकल्स श्रेणीचा शुभारंभ
मुंबई, ७ सप्टेंबर २०२१ : सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँड ओरिफ्लेम स्थापनेपासूनच सौंदर्य, विश्वास आणि प्रभावीपणासाठीचा उत्तम पर्याय बनले आहे. स्वच्छ आणि सौंदर्यासाठी जगभरात जागृती होत असताना ब्रँडने ब्युटेनिकल्ससह आणखी एक बेंचमार्क स्थापन केला. ही एक नवी जबाबदार ब्युटी रेंज असून नव्या काळातील ग्राहकांसाठी सुंदर स्पष्टपणा प्रदान करतके. ही सुरक्षित आणि प्रभावी फॉर्म्युल्यांची रेंज असून ती #नथिंगटूहाईडसह निसर्गाचा आदर करते.       ब्युटेनिकल्सची रेंज स्कँडिनेवियाच्या शुद्ध पाण्यापासून प्रेरित असून ती बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट आणि ८ आवश्यक खनिजांच्या सिद्ध शक्तींपासून संचलित आहे. यात ९५ टक्के नैसर्गिक मूल तत्त्व असून ते पॅराबेन्स आणि सिलिकॉनशिवाय तयार करण्यात आले आहेत. बायोडिग्रेडेबल रिन्स-ऑफ फॉर्म्युलेशनसह तसेच द वीगन सोसायटीसोबत ते नोंदणीकृत आहेत. स्कँडिनेवियातील शुद्ध पाण्यात आठ आवश्यक खनिजांपासून निरोगी सौंदर्याचे लाभ असलेली श्रेणी तयार करण्यासाठी स्वीडिश नैसर्गिक हनीसकल घटकासह बीस्पोक ब्लेंडमध्ये तयार करण्यात आले आहे.           ब्युटेनिकल्स श्रेणीमध्ये ब्युटेनिकल्स रिपेयरिंग शांपू आणि ब्युटेनिकल्स रिपेयरिंग कंडिशनरसह सुंदर, निरोगी केसांसाठी विचारशील फॉर्म्युले आहेत. यासह ब्युटेनिकल्स रिपेयरिंग हँड साल्वे आणि ब्युटेनिकल्स रिवायटलिंग बॉडी क्नीनजरसह या रेंजद्वारे  सुंदरतेने सरळ व प्रभावीपण शरीराची देखभाल केली जाते. सोडियम, कॅल्शियम, झिंक, सिलिका, कॉपर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारख्या आवश्यक खनिजांसह स्वीडिश नॅचरल हनीसकल एक्सट्रॅक्ट केस आणि शरीराला निसर्गाप्रती सुंदर बनवते. तसेच संपूर्ण शरीराला नखशिखान्त नैसर्गिक सौंदर्य प्रदान करते.      या लाँचिंगविषयी फ्रेडरिक विडेल म्हणाले, "ओरिफ्लेममध्ये आम्ही मानतो की, प्रामाणिकता प्रत्येक गोष्टीच्या हृदयात असते. तिची सुरुवात स्वतःपासून होते. ब्युटेनिकल्ससह नैसर्गिक सौंदर्याच्या तत्त्वांचा अनुभव घ्या. वनस्पती आणि खनिज आधारीत घटकांपासून पुनर्निर्मित घटकांपासून बनलेल्या पॅकेजिंग मटेरिटयलपर्यंत, ब्युटेनिकल्स हे सर्वच पैलूंमध्ये सौंदर्य आणि कल्याणासाठी  अद्वितीय दृष्टीकोनाचे प्रतीक आहेत.”          नवीन आनंद म्हणाले, “ब्युटेनिकल्स ही नवी रेंज सादर करताना आम्हाला अभिमान वाटतोय. ती ब्युटी आणि वैलनेस इंटस्ट्रीवर सध्या वर्चस्व असलेल्या स्वच्छ सौंदर्याच्या चर्चेत एक गेमचेंजर ठरू शकते. ओरिफ्लेमने नेहमीच विश्वसनीय, प्रभावी आणि सुरक्षित फॉर्म्युलेशनसह अपेक्षांच्या पुढे कामगिरी केली आहे. ती निसर्गाने प्रेरित आणि विज्ञानाद्वारे संचलित असते. ब्युटिशियनसह टिकाऊपणासंबंधीच्या सर्व यशस्वी टप्प्यांचा आम्हाला अभिमान आहे. या उद्योगाची नव्याने व्याख्या करणाऱ्या पारदर्शकता, प्रेम आणि देखभालीच्या वैशिष्ट्यांसह आम्ही एक पाऊल पुढे आहोत."

ओरिफ्लेम द्वारे नव्या ब्युटेनिकल्स श्रेणीचा शुभारंभ ओरिफ्लेम द्वारे नव्या ब्युटेनिकल्स श्रेणीचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on September 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads