Header AD

कल्याणमध्ये १३९ रक्तदात्यांना देण्यात आला ५ लाखांचा मोफत विमा


■तिरंगा जागृती विचार मंचहर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि टिम परिवर्तनचा एकत्रित उपक्रम..कल्याण , कुणाल  म्हात्रे  : रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठ कर्तव्य आहे आपण केलेल्या रक्तदानामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचु शकतात त्याचबरोबर रक्तदान ही लोकचळवळ व्हावी या हेतुने कल्याण शहरांत शनिवारी तिरंगा जागृती विचार मंचहर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि टिम परिवर्तनच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १३९  युनिट रक्त संकलित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ५ लाख रुपयांचा विमा देखील विनाशुल्क देण्यात आला.  रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन टीम परिवर्तनचे अविनाश पाटीलस्वप्नील शिरसाठनामदेव येडगेभुषण राजेशिर्के त्याचबरोबर तिरंगा जागृती विचार मंचचे चेतन म्हामुणकरगिरीश कदमसंजय गोडसेकोमल म्हामुणकरसमीर जोशीअजित कासारसंदीप राजपुतराकेश मोरेनितेश पडवळमारुती राठोडविष्णु नावले यांनी केले. या शिबीरात अवयवदान जनजागृती करण्यात आली यांसाठी एन. पी. अय्यरअशोक बरवाणकरप्रमोद जोशीप्रमोद पाटील यांनी सहकार्य केले. रक्तदान हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे असे शिबिर यापुढेही आम्हीं घेणार असल्याचे तिरंगा जागृती विचार मंचचे संस्थापक सचिन यादवडे यांनी सांगितले.       रक्तदान शिबिरासाठी संतोष भोईर यांनी विशेष सहकार्य केले. रक्तदान आणि अवयवदानाच्या चळवळीत युवकांनी सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन आप्पा घोरपडे यांनी यावेळीं केले. अक्षय ब्लड सेंटरहडपसर पुणे यांच्या टीमने रक्तदान शिबिरात आपले अमुल्य योगदान दिले. रक्तदान विषयक युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी कोणताही रुग्ण रक्तावाचून दगावू नये यांसाठी यापुढील काळात आम्हीं विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने अनेक समाजोपयोगी कामे करणार आहोत असे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले.

कल्याणमध्ये १३९ रक्तदात्यांना देण्यात आला ५ लाखांचा मोफत विमा कल्याणमध्ये १३९ रक्तदात्यांना देण्यात आला ५ लाखांचा मोफत विमा Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads