Header AD

ललिता मोरे यांना राज्यस्तरीय दोन पुरस्कार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर, कल्याण पूर्व या शाळेत गेल्या ३२  वर्षांपासून ललिता मोरे या उपक्रमशील शिक्षिका म्हणून विद्यार्थी व शाळेसाठी सतत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला असून शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्कार २०२१ देखील जाहीर झाला आहे.
ललिता मोरे यांनी कोरोना काळात ४० दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण व मदत करणे. सीएसआर अंतर्गत संस्थेला ५ लाखांचा निधी प्राप्त करवून देणेआमदार गणपत गायकवाड यांच्या आमदार निधीतून ५ लाख रुपये किमतीचे संगणक शाळेतील विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे. शार्प या एनजीओ मार्फत ५०८ गरजू विद्यार्थ्यांना बाटा शूजचे वाटप करणे. 

शालेय परिसर स्वच्छता अभियान राबविताना गेल्या १५ वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याचा डोंगर हटविण्यासाठी केडीएमसी प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे,पोलीस कर्मचारी,सर्पमित्र,सफाई कामगार,जेसीबी मशीन,ट्रक यांच्या सहकार्याने ८ ट्रक कचरा साफ करवून घेणे आदी कार्य केले आहे.
यासारखे अजूनही अनेक सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम राबविल्याची दखल घेऊन ललिता मोरे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेने ५ सप्टेंबर शिक्षकदिनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ञअसेच अनेक दिगग्ज मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत मानपत्र,महावस्त्रमानाचा फेटा,गौरवपदक,,मानकरी बॅचसन्मानचिन्ह,या स्वरुपात ऑनलाईन राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

तसेच शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ पण जाहीर झालेला आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे, चिटणीस दीपक पाटील, शिक्षण समिती प्रमुख अशोक बिऱ्हाडे, कोषाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य, तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापिकासर्व शिक्षक सहकारी वृंदविद्यार्थीपालक व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.

ललिता मोरे यांना राज्यस्तरीय दोन पुरस्कार ललिता मोरे यांना राज्यस्तरीय दोन पुरस्कार Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads