Header AD

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोपर पुलासह ८ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणार्या कोपर पुलासह महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचे ऑनलाईन लोकापर्ण केले जाणार आहे.डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारे कोपर पूल सप्टेबर २०१९ रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असले तरी या पुलाच्या कामासाठी ठेकेदारच मिळत नसल्याने रखडलेले पुलाचे काम पालिका प्रशासनाने सव्वा वर्ष इतक्या विक्रमी वेळेत पूर्ण करत नागरिकांना वाहनचालकांना दिलासा दिला आहे. या पुलाब्ररोबरच मुख्यमंत्र्यच्या हस्ते सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट,  रुक्मिणीबाई व डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ग्रामीण भागातील आय प्रभागातील नागरी आरोग्य केंद्र, आंबिवली मधील जैवविविधता उद्यान, तेजस्विनी बस आणि कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस, टिटवाळा अग्निशमन केंद्र या सारख्या ८ प्रकल्पाचे लोकापर्ण केले जाणार असून हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी १ वाजता पालिकेच्या डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहे. 

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोपर पुलासह ८ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोपर पुलासह ८ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads