Header AD

शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक गेले विद्यार्थ्यांच्या घरी


■आई-वडील आणि शिक्षकांची फसवणूक करू नका - डॉ. विनीत माळगावे..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भारतात गुरु-शिष्य परंपरा आणि संस्कृती अनेक वर्षापासून चालून आलेली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधत पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक  विद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी डॉ.विनीत माळगावे उपस्थित होता.


विनीत माळगावे यांनी ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. मी याच शाळेत शिकलो.  माझ्या गुणवत्तेने मी जे. जे. मेडिकल कॉलेजला एमबीबीएस केले. आता नायर मेडिकल कॉलेजला एमडी करीत आहे. मला माझ्या शिक्षकांचंआई-वडिलांचे मार्गदर्शन लाभलं. मुलांनो  तुम्ही जरी मराठी माध्यमाची मुले असले तरी नाराज होवू नका. मेहनतजिद्दचिकाटी ने तुम्ही आवड असलेल्या क्षेत्रात नक्कीच जाल. मराठी माध्यमाची मुले सुद्धा डॉक्टर वकील अधिकारी झालेत. आताही होत आहेत.आपण  आई-वडील व शिक्षकांशी  प्रामाणिक राहा. त्यांना फसवू नका. तुम्हाला यश मिळणार असेही सांगितले.कार्यक्रम संपल्यावर शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह गणेश पाटीलओमप्रकाश धनविजय या शिक्षकांनी जी मुले ऑनलाइन तासांना हजर राहत नाही. शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांच्या घरी भेट दिली. त्यांच्या अडचणी समजून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासन निर्णय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांकरिता माझा शिक्षक माझा प्रेरककोविड कालावधीतील शिक्षकाची भूमिकाउपक्रमशील शिक्षक या विषयावर निबंध स्पर्धा व आधुनिक काळामध्ये शिक्षकाची बदललेली भूमिकादेशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान व शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम या विषयांवर ऑनलाईन वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला सचिन धनविजयविद्या कांबळे यांच्यासह चेतन धिंदळे, हर्षल बेंडकुळे, कृष्ण महेंद्रकर या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक गेले विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक गेले विद्यार्थ्यांच्या घरी Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads